AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस विकत घ्यायची परवानगी दिली पण महिन्याभराचा साठा अगोदरच बूक केलाय’

महाराष्ट्राला आणखी किमान महिनाभर तरी सिरम इन्स्टिट्यूटकडून लसी उपलब्ध होण्याची शक्यता नाही | Rajesh Tope Serum covishield

'केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस विकत घ्यायची परवानगी दिली पण महिन्याभराचा साठा अगोदरच बूक केलाय'
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Apr 22, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई: केंद्र सरकारने 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी थेट सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून थेट लस विकत घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत सिरम इन्स्टिट्यूटशी (Serum institute) बोलणी सुरु केली तेव्हा केंद्र सरकारने लसींचा आगाऊ साठा अगोदरच आरक्षित करुन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra govt asking for more oxygen from central govt)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही सिरम इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला तेव्हा अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारने 24 मे पर्यंतच्या लसींचा साठा मिळवण्यासाठी आगाऊ नोंदणी करुन ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी किमान महिनाभर तरी सिरम इन्स्टिट्यूटकडून लसी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी ‘भारत बायोटेक’कडून कोव्हॅक्सीन लस मिळवण्यासाठी बोलणी करत आहेत. मात्र, भारत बायोटेकने अद्याप राज्यांना कोणत्या किंमतीने लस विकायची हे निश्चित केलेले नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतरच महाराष्ट्राला भारत बायोटेकडूनकडून लसी विकत घेता येतील, असेही टोपे यांनी म्हटले.

याशिवाय, इतर परदेशी लसी या खूप महागड्या आहेत. मात्र, आपण मोठ्याप्रमाणात लसींचा साठा विकत घेतल्यास लसींच्या किंमतीमध्ये सवलत मिळू शकेल, का याबाबत संबंधित कंपन्यांशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या लसी भारतात उपलब्ध झाल्यास श्रीमंत नागरिक पैसे देऊन त्या विकत घेऊ शकतात, असे टोपे यांनी म्हटले.

ऑक्सिजनसाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे: टोपे

महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धता कोटा वाटप हे केंद्र सरकार करते. महाराष्ट्राला केंद्राने जास्त कोटा द्यावा. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट कॉरिडोअर उपस्थित करुन द्यावा, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली.

संबंधित बातम्या : 

Covid vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा, महाराष्ट्राला 20 कोटी लशींची गरज

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका

‘पंतप्रधान मोदींच्या मनात आकस नाही, पण भाजपमधील ‘शुक्राचार्यांच्या’ राजकारणामुळे महाराष्ट्राच्या मदतीत अडथळे’

(Maharashtra govt asking for more oxygen from central govt)

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला