AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून गुलाबरावांनी शिवसेनेच्या पोस्टरवर फडणवीसांचा फोटो लावला, टीव्ही9 स्पेशल पॅकेज

शिंदे गटाला धनुष्यबाण मिळाल्याच्या अभिनंदनवाल्या पोस्टरवरही गुलाबरावांनी फडणवीसांचा फोटो लावलाय. पाटलांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंसहीत फडणवीसांच्या लागलेल्या फोटोची चर्चा

...म्हणून गुलाबरावांनी शिवसेनेच्या पोस्टरवर फडणवीसांचा फोटो लावला, टीव्ही9 स्पेशल पॅकेज
| Updated on: Feb 22, 2023 | 12:09 AM
Share

मुंबई : सरकारी योजनेते राज्यातल्या दोन्ही प्रमुखांचा फोटो असतो. मात्र गुलाबरावांनी शिवसेनेच्या पोस्टरवर फडणवीसांचा फोटो लावला आहे. काय आहे त्यामागचं कारण. पाहूयात हा रिपोर्ट. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंसहीत फडणवीसांच्या लागलेल्या फोटोची चर्चा होतेय. एरव्ही युती म्हणून योजनांच्या पोस्टर्सवर दोन्ही नेत्यांचा फोटो असतो. मात्र शिंदे गटाला धनुष्यबाण मिळाल्याच्या अभिनंदनवाल्या पोस्टरवरही गुलाबरावांनी फडणवीसांचा फोटो लावलाय.

गुलाबराव पाटलांनी फडणवीसांचा फोटो का लावला. यामागे अनेक कारणं चर्चेत आहेत. त्यातलं एक म्हणजे शिंदे-भाजप युती असली तरी स्थानिक पातळीवर यामागे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न गुलाबराव करतायत. कारण, गेल्यावेळी शिवसेना-भाजप युती असूनही 2019 च्या विधानसभेवेळी काही ठिकाणी भाजप उमेदवारांनी बंडखोरी केली होती., त्यावरुन युतीच्या सभेतच गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांमध्ये बाचाबाचीही झालेली.

निकालानंतर जेव्हा मविआ सरकार बनलं. तेव्हा भाजपनं युतीधर्म न पाळल्याचा आरोप खुद्द गुलाबराव पाटलांनीच केला होता. गुलाबराव पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेतल्या पोस्टरवर भाजपला स्थान देण्यामागचं अजून एक दुसरं कारण म्हणजे 2019 मधलाजळगाव ग्रामीण विधानसभेचा निकाल. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांची मुख्य लढत राष्ट्रवादीशी होते. मात्र 2019 चं चित्र वेगळं होतं.

शिवसेना भाजप युतीकडून गुलाबराव पाटील मैदानात होते. त्यांच्याविरोधात आघाडीतून राष्ट्रवादीनं पुष्पा महाजन यांना तिकीट दिलं आणि भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांनीही अपक्ष अर्ज भरला. सुरुवातीला लढत गुलाबराव आणि पुष्पा महाजनांमध्ये होण्याचा अंदाज होता. मात्र निकालाचं चित्र वेगळं राहिलं.

गुलाबराव पाटील 88 हजार 609 मतं घेऊन जिंकले. दुसऱ्या स्थानावर भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदेंनी 48271 हजार मतं घेतली आणि राष्ट्रवादीच्या पुष्मा महाजनांना फक्त 14327 हजार मतं मिळाली. गेल्यावेळी जळगावात बंडखोर चंद्रशेखर अत्तरदेंना जरी भाजपचा अधिकृत पाठिंबा नव्हता, तरी अत्तरदेंनी भाजपचा झेंडा आणि प्रचार साहित्य घेऊन सर्रासपणे प्रचार केला. त्याचीच खदखद गुलाबरावांनी मविआ सत्तेत आल्यानंतरच्या एका सभागृहात व्यक्त केली होती.

असं म्हटलं जातंय की याआधी जिथं भाजपचे बंडखोर उभे होते. तिथं आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्यायुतीनंतर एकजूट हवी., यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कारण गुलाबराव गेल्यावेळी ४० हजारांनी जिंकले होते. यावेळी सुषमा अंधारेंसहीत ठाकरे गटानं खान्देशात सभा घेतल्या आहेत. दुसरीकडे गुलाबरावांचे शेजारी आणि शिवसेनेचे नेते चिमणराव पाटलांमधला दुरावा वारंवार उघड झालाय. त्यात जर मविआचा प्रयोग झाला तर शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युतीत आपापसात बंडखोरी नको हे सांगण्याचा प्रयत्न नेत्यांकडून होतोय.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.