Maharashtra Lockdown : 20 बेड्स असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरणाला परवानगी, कामगारांसाठीही महत्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यात उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता.

Maharashtra Lockdown : 20 बेड्स असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरणाला परवानगी, कामगारांसाठीही महत्वाचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यात उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखही सहभागी होते. या बैठकीत उद्योजकांनी शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray’s meeting with entrepreneurs, important decision regarding workers)

वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य तिथे कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची तसेच वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केली आहे. जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या (तो कंत्राटी असला तरी) कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी. कोविड विरोधात लढताना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू, असं मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना सांगितलं.

20 बेड्स असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरणाला परवानगी

त्याचबरोबर प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखणे ही आत्ताची सर्वोच्च प्राधान्याची गरज. राज्याची २४x७ लसीकरणाची तयारी. जिथे २० बेड्स आहेत त्या आरोग्य केंद्रात लसीकरणास परवानगी. लसीची सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीत लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोविड नियंत्रणासाठी शासन करत असलेल्या अथक प्रयत्नांचे उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केलं. तसंच काही सूचनाही मांडल्या. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याची ग्वाहीही उद्योजकांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत खलबतं सुरू

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह

CM Uddhav Thackeray’s meeting with entrepreneurs, important decision regarding workers

Published On - 4:59 pm, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI