चित्रा वाघ रश्मी करंदीकर यांच्या भेटीला, फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार

चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंग प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. (Chitra Wagh meets Rashmi Karandikar)

चित्रा वाघ रश्मी करंदीकर यांच्या भेटीला, फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार
चित्रा वाघ आणि रश्मी करंदीकर
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:18 PM

मुंबई : फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) पोलिसात गेल्या. सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर (Cyber Crime DCP Rashmi Karandikar) यांची भेट चित्रा वाघ यांनी घेतली. फोटो मॉर्फिंग (Photo Morphing) प्रकरणी वाघ यांनी तक्रार दाखल केली. (Chitra Wagh meets DCP Rashmi Karandikar in BKC Police station complaint in Photo Morph Case)

संजय राठोडांसह फोटोचे मॉर्फिंग

चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंग प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि शिवसेना नेते संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा जुना फोटो मॉर्फ करण्यात आला होता.

चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिलेली आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

मॉर्फ केलेल्या फोटोवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया काय?

“माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचंय? मिनिटा मिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातोय. मला काम करता येत नाहीय. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्याचबरोबर “तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्याचा फोटो मॉर्फ करणाऱ्यांना उत्तर दिलं. (Chitra Wagh meets DCP Rashmi Karandikar in BKC Police station complaint in Photo Morph Case)

“तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे”, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला

संबंधित बातम्या :

चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो

(Chitra Wagh meets DCP Rashmi Karandikar in BKC Police station complaint in Photo Morph Case)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.