AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी; चित्रा वाघ यांचा खोचक सवाल

राज्य सरकारने चंद्रपूरची दारुबंदी उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. (chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)

क्या हुआ तेरा वादा...जयंतरावजी; चित्रा वाघ यांचा खोचक सवाल
chitra wagh-jayant patil
| Updated on: May 29, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई: राज्य सरकारने चंद्रपूरची दारुबंदी उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. यवतमाळमधील दारुबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. (chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)

चित्रा वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

तर घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल

यवतमाळ राहिलं दूर. चंद्रपूरची दारुबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळमध्ये दारुबंदी

चित्रा वाघ यांनी एक 43 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असतानाचा विधानसभेतील हा व्हिडीओ आहे. विधानसभेत जयंत पाटील यवतमाळच्या दारुबंदीवर पोटतिडकीने बोलताना दिसत आहेत. कालच मला स्वामिनी जिल्हा दारुबंदी आंदोलनाच्या काही भगिनी भेटल्या. त्यांची मागणी काय होती, यवतमाळमध्ये दारुबंदी करा. आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली. त्यावेळी त्या भेटल्या आणि म्हणाल्या दारुबंदी करा. मी त्यांना सांगितलेलं आहे, सुधीरभाऊ करतात की नाही ते बघा. नाही तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही?, असा सवाल पाटील करताना दिसत आहेत. (chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)

संबंधित बातम्या:

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा, चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकर यांचा घणाघात

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील कामांबाबत मोठा निर्णय, आता 10 लाखावरील कामांसाठी ई-निविदा

‘चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी?’ पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल

(chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.