नागपूरवाले मला म्यूट का करतात?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. (cm uddhav thackeray addressing nagpurkar)

नागपूरवाले मला म्यूट का करतात?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई: देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरकरांशी संवाद साधत असताना ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्यावेळी मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. (cm uddhav thackeray addressing nagpurkar)

नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा नागपूरकरांशी हा संवाद सुरू असताना तांत्रिक कारणामुळे मध्येच माईक बंद झाला. तेव्हा नागपूरवाले मला मध्येच का म्यूट करत आहे, असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग

नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितलं.

नागपूर- मुंबई एक झाले

नागपुरात आता कार्यालय सुरू झालंय. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असं ते म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. (cm uddhav thackeray addressing nagpurkar)

 

संबंधित बातम्या:

मनसेतही मेगाभरती सुरु, ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही ‘रेल्वे इंजिना’त!

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

भाजपच्या ‘सायलेंट वोटर्स’वर काँग्रेसचं लक्ष, 5 राज्यांसाठी नवी रणनिती काय?

(cm uddhav thackeray addressing nagpurkar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI