AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज रात्रीच संवाद साधणार

आता उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना नेमके कोणते आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. | CM Uddhav Thackeray

घणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज रात्रीच संवाद साधणार
| Updated on: Oct 27, 2020 | 6:42 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. आज रात्री 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून, उद्धव ठाकरे हे शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण केलं होतं. या भाषणातून त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होताच, मात्र त्याशिवाय त्यांनी शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेले भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष घणाघात केला होता. (CM Uddhav Thackeray calls important meeting of Shivsena leaders)

या हल्ल्यानंतर नारायण राणे यांनी आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. ही सर्व पार्श्वभूमी असताना, आता उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना नेमके कोणते आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यपालनियुक्त आमदारांच्या नावाबाबत चर्चा शक्य

दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. या यादीवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता खिल्ली उडवली. दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं. काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असा टोला लगावतानाच या भाषणातून महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर काहीच भाष्य करण्यात आलं नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप, असा चिमटा पाटील यांनी काढला.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही; नारायण राणेंचा घणाघात

जीएसटी फसल्याचं मान्य करून रद्द करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडाडले

इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे

(CM Uddhav Thackeray calls important meeting of Shivsena leaders)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...