दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता खिल्ली उडवली आहे.

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता खिल्ली उडवली आहे. (chandrakant patil slams uddhav thackeray over dussehra rally)

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं. काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असा टोला लगावतानाच या भाषणातून महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर काहीच भाष्य करण्यात आलं नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप, असा चिमटा पाटील यांनी काढला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली होती. त्याचाही पाटील यांनी समाचार घेतला. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहीत आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देऊ, असंही त्यांनी ठणकावले. हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणावर आम्हाला राजकारण करायचं नाही. पण सरकार या विषयात गंभीर नाही. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावे, असं सांगतानाच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यायाचा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घ्यायाचा हा विषय आता नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नाही. तुम्हाला वेळेवर जाता येत नाही. सरकारच्या वेगवेगळ्या वकिलामध्ये समन्वय नाही. सुनावणी आधी मंत्र्यानी दिल्लीत जाऊन पूर्वतयारी करायला हवी होती. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यायचं आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. सरकारमुळे सगळ्या प्रवेश प्रक्रिया थांबल्या आहेत. आता एक महिना सगळं शांत असेल. शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. पण या विषयात सरकार गंभीर नाही , असा दावाही त्यांनी केला. (chandrakant patil slams uddhav thackeray over dussehra rally)

संबंधित बातम्या:

Maratha Reservation : अशोक चव्हाण की उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा विषय आता नाही : चंद्रकात पाटील

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठक, अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या निर्णयाची शक्यता

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल

(chandrakant patil slams uddhav thackeray over dussehra rally)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *