ठाण्यातील दहा मजली कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

(CM Uddhav Thackeray E-inaugurated COVID Hospital at Balkum Saket in Thane)

ठाण्यातील दहा मजली कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 3:24 PM

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरील दुसऱ्या कोविड उपचार सुविधा केंद्राचे आणि ठाण्यातील कोविड रुग्णालय केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले. (CM Uddhav Thackeray E-inaugurated COVID Hospital at Balkum Saket in Thane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यांना मी इथल्या कोविड रुग्णालयाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवणार आहे. महाराष्ट्राने काय केलं हे मी देशाला आणि पंतप्रधानांना दाखवणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

बीकेसीमध्ये एक हजार बेड्सची व्यवस्था असलेल्या कोविड उपचार सुविधा केंद्रात गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचाराची सुविधा देखील आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार बेड्सचे केंद्र केवळ 15 दिवसांत बांधून पूर्ण करण्यात आले होते. त्या पाठोपाठ याच धर्तीवर दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालय उभारणीच्या कामास मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात सुरुवात करण्यात आली होती.

आता उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोविड सुविधा केंद्रात एक हजार बेड्सची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी 100 बेड्सचा अतिदक्षता विभागदेखील असणार आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा या रुग्णालयात असल्याची माहिती आहे.

तसेच डायलिसिसची सुविधादेखील असून 900 बेड्सपैकी काही बेड्सना ऑक्सिजन सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा तात्पुरत्या स्वरुपाची असली तरी पावसाळ्यात टिकून राहण्याची क्षमता यामध्ये असल्याचं सांगितलं जातं.

दुसरीकडे, ठाण्यातील रुग्णालयामध्ये एकूण 1204 बेड्स असून 500 बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील 76 बेड्स हे आयसीयूचे असून 10 बेड्स डायलिसिस रूग्णांसाठी तर 10 बेडस ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात.

“मैदानात ही हॉस्पिटल तात्पुरती आहेत पण यात आयसीयू बेड, वीज, पाणी आणि शौचालयापर्यंत सर्व व्यवस्थित आणि सुरळीत दिले आहे. वैद्यकीय मदत करणाऱ्या डॉक्टर नर्सेस वॉर्डबॉय यांच्या रुपात देव काम करत असताना दिसत आहे” असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray E-inaugurated COVID Hospital at Balkum Saket in Thane)

वस्ती पातळीवर ऑक्सिजन तपासणी सुरु केली आहे. त्यामुळे कोविडच्या रुग्णाची लवकर ओळख होत आहे. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आपले राज्य या संकटावर मात करेलच, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

(CM Uddhav Thackeray E-inaugurated COVID Hospital at Balkum Saket in Thane)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.