CM Uddhav Thackeray Discharge | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज, रिलायन्स रुग्णालयातून ‘वर्षा’वर

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते

CM Uddhav Thackeray Discharge | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज, रिलायन्स रुग्णालयातून 'वर्षा'वर
CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर सुपुत्र आदित्या ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

उद्धव ठाकरे यांना मणका-मानदुखीचा त्रास

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला आहे.


उद्धव ठाकरेंच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर सीएमओने एक निवेदन जारी केले होते. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ऑपरेशननंतर त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी सिंह यांनी फोनवरुन संवाद साधत ही चौकशी केली होती.

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंची प्रकृती स्थिर, योग्य वेळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार: CMO

Published On - 10:26 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI