पालघर हत्याकांड धार्मिक वादातून नाही, खटला CID कडे, अमित शाहांशीही चर्चा : मुख्यमंत्री

आज पुन्हा मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालघार मॉब लिंचिंगप्रकरणीही स्पष्टीकरण दिलं. 

पालघर हत्याकांड धार्मिक वादातून नाही, खटला CID कडे, अमित शाहांशीही चर्चा : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 3:34 PM

मुंबई : पालघरमध्ये घडलेल्या मॉब लिंचिंगनंतर (Uddhav Thackeray On Palghar) संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. अनेकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज (20 एप्रिल) राज्यातील जनतेशी लाईव्ह प्रसारणाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर प्रकरणातील दोषींना शिक्षा (Uddhav Thackeray On Palghar) होणारच, महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन दिलं.

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

“कोरोना विरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे. हे करत असताना काही गोष्टी अशा घडतात की, ते लांच्छनास्पद आहेत. काल दुपारनंतर एका घटनेची सगळीकडे चर्चा सुरु होती. पण हे घडलं ते 16 तारखेला घडलं. यापूर्वीदेखील 5 वर्षात अशा काही घटना ज्याला मॉब लिंचिग म्हणतो त्या घडल्या आहेत. या अशा घटना होता कामा नये. ही आपली संस्कृती नाही. मुद्दा काय येतो ते झाल्यानंतर सरकार काय करतं? हे पालघर जिल्ह्यात घडलं. पण प्रत्यक्षात पालघरपासून 110 किमी लांब म्हणजे जिथे दादरानगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे त्या सीमेजवळ ही घटना घडली.”

“काय घडलं नेमकं? लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण कुठे ना कुठे जाऊ इच्छितो. पण जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत हे दोन साधू सरळ मार्गाने जाऊ शकणार नाहीत, म्हणून एका दुर्गम भागातून ते जात होते. जिथे गडचिंचोली नावाचं एक गाव आहे. हे गाव खास करुन ज्यांना असं वाटतंय की, हे मुद्दामुन घडवलं गेलंय, हे दोन धर्मातलं काहीतरी आहे त्यांना सांगू इच्छितो लॉकडाऊन उघडल्यानंतर गडचिंचोली गाव कुठे आहे हे एकदा जाऊन बघा. पालघर जिल्ह्यात अत्यंत दुर्गम भागामध्ये हे गाव आहे. म्हणजे एक पाडा आहे तो. तिथपासून काही अंतरावर दादरानगर हवेली, शिलवासा हा भाग येतो. त्याची हद्द तिथून सुरु होते. त्यावेळेला असं झालं की, हे दोन साधू गुजरातमधून जात होते.”

“त्यावेळेला असं झालं की, हे दोन साधू गुजरातमध्ये चालले होते. त्यावेळेला असं झालं की, दादरानगर हवेली येथे त्यांना अडवलं गेलं आणि अडवल्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं आणि परतत असताना हा जो काही परिसर अत्यंत दुर्गम परिसर आहे. त्यावेळेला गैरसमजेतून त्यांच्यावर हल्ला केला गेला. दुर्देवाने त्यांची हत्या झाली. समजा या काळामध्ये आपण माणुसकी पाळली. दादरानगर हवेलीमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली असती तर रितसर सरकारच्या ताब्यात त्यांना दिलं गेलं असतं तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. पण केंद्रशासित प्रदेशातून त्यांना नाकारलं गेलं. तिथून परत पाठवलं गेलं.”

“गडचिंचोली हे गाव आहे, तिथे महाराष्ट्रातून जायला यायला रस्ता नाही. हे दुर्देवं आहे आणि हे मान्य करायला हवं. आपल्या पोलिसांनाही तिथे जायचं असेल तर दादरनगर हवेलीतून यावं लागतं. त्यावेळेला तिथे जास्त असताना पोलिसांच्या गाडीवर पलिकडच्या भागातून हल्ला झाला होता. एकूण काय पोलिसांवरही हल्ला झाला आणि साधूंवरही हल्ला झाला आणि त्यांच्या ड्रायव्हरलासुद्धा अत्यंत निर्घूनपणाने मारलं.” (Uddhav Thackeray On Palghar)

“साधू लवकर जाता यावे म्हणून दुर्गम भागातून जात होते, हत्याकांड घडलेला भाग दादरा नगर हवेलीजवळ, हे हत्याकांड दोन धर्मातल्या वादातून नाही, पालघरपासून 110 किमी दूर अंतरावर हत्याकांड घडले”

“मुख्य म्हणजे यातले पाच मुख्य आरोपी आज तुरुंगात आहेत. पोलीस काय करत आहेत? सरकार करत आहेत? केलं ना. आम्ही केलं आणि कुणालाही नाही सोडणार. जे लोक आग लावायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आग लावू नये. ही काय धर्माची गोष्ट नाही. गैरसमजामुळे हत्या केली गेली. मात्र, मारेकऱ्यांना सोडलं जाणार नाही. याच्यात मी जातपात धर्म बघत नाही. एकतर तिथल्या दोन पोलिसांना तत्काळ निलंबित केलं गेलं आहे. डीजी सीआयडी क्राईम अतुल कुलकर्णी यांना त्यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी शोध करायला सांगितलं आहे. हे प्रकरण आपण सीआयडीकडे दिलं आहे.”

“या प्रकरणी एसपींनी मध्यरात्री साडे बारा वाजता जाऊन कारवाई केली. पहाटे 5 वाजेपर्यंत जंगलातून 100 जणांना पकडलं, पाच मुख्य आरोपी गजाआड, धार्मिक नाही, तर गैरसमजातून हत्या असूनही कोणालाही माफ करणार नाही, दोन पोलिसांचंही निलंबन करण्यात आले आहे.”

या प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो. या भागात धार्मिक तेढ नसल्याची त्यांनाही कल्पना, काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“अमित शहा यांच्याशी मी बोललो तेव्हा त्यांनीही सांगितलं की, उद्धवजी मला माहिती आहे की, या घटनेत तशी काही गोष्ट नाही. फक्त एक काळजी घ्या. काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन आला. मी त्यांनाही सांगितलं हे मॉब लिंचिंगचा प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात हा प्रकार सहन केला जाणार नाही. मग कारणं काहीही असो. जसा पूर्वी धुळे, चंद्रपुरात हा प्रकार घडला. असा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडता कामा नये.”

“याप्रकरणातील हल्लेखोर सुटणार नाहीत. जो विश्वास तुम्ही महाराष्ट्र सरकारवर दाखवत आहात तेच आमचं बळ आहे. याच बळावर जसं हे कोरोनाचं युद्ध आपण जिंकणार आहोत तसंच गुंडगिरी, दंगेधोपे करणारे आणि खास करुन सोशल मीडियावर आग लावणारे जे लोकं आहेत त्यांच्याबाबतही मी अमित शहांना सांगितलं आहे. आग लावणाऱ्या लोकांचा तु्म्ही शोध घ्या आणि आम्ही शोध घेतो. कारण आगी लावणारे एककीकळे राहून जातात. त्यांना काही झळ पोहोचतच नाही. त्यांना लवकरात लवकरच शोध लावून पकडणं गरजेचं आहे.”

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“20-25 दिवसांनंतर गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण थोडीफार हालचाल सुरु करत आहोत. गावागावात इतर जिल्ह्यांमध्ये काल मी आपल्याला कल्पना दिलेली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनप्रमाणे आपण काही सूचना देऊन हळूहळू हातपाय हलवायला सुरुवात केली आहे. संकट टळलंय असा समज कृपया कुणी करुन घेऊ नये. लॉकडाऊन टळलेला नाही. फक्त रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा गती द्यावी म्हणून आपण ही सुरुवात केली आहे.”

“हा लकडाऊन लवकर संपवण्याचं आपल्या हातामध्ये आहे. आपण जितकं शिस्त पाळाल तेवढं लवकर आपण या संकंटावर मात करुन बाहेर पडू. आजदेखील मला काही ठिकाणाहून माहिती मिळते की, जणूकाही लॉकडाऊन उठवलेले आहे अशी गर्दी गोळा होत आहे. हे अजिबात चालणार नाही. जर का अशी गर्दी व्हायला लागली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर कदाचित निर्बंध अधिक घट्ट करावे लागतील. एकूणच आपल्या हलचालींवरती पुन्हा काही दिवसांसाठी बंधने टाकावे लागतील. ही जी काही बंधनं आहेत त्यावर काही शिथिलता आणली गेली आहे आणि ते केवळ आपल्यासाठी आहे.”

“आज मी पुन्हा आपल्यासमोर आलेलो आहे याचं कारण असं की गेल्या जवळपास महिनाभरापासून म्हणजे दिवसांच्या हिशोबाने बोलायचं झालं तर महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळल्यानंतर आज सहा आठवडे पूर्ण होत आहेत. सहा आठवडे आपण जसे जिद्दीने आणि नाईलाज म्हणून घरामध्ये बसलात तसेच आपले सगळे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, पोलीस, साफसफाई करणारे कर्मचारी, महसूल यंत्रणा संगळेच हे अत्यंत तणावाखाली मेहनत करत आहेत. मग कुठे गर्दीला थोपवणं, आपली अन्नधान्याची साखळी सुरळीत चालू ठेवणं या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत.”

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

राज्यातील स्थिती काय?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलंडला आहे. आज राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे आज राज्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे. तर मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 724 वर पोहोचला आहे.

Uddhav Thackeray On Palghar

संबंधित बातम्या :

उद्योगधंद्यांना परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 15 मुद्दे

मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार, लहान मुलांनी काळजी करु नका : मुख्यमंत्री

कितीही पत्ते पिसा, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, राऊतांनी ठणकावलं, राज्यपाल सदगृहस्थ, सदाचारी आणि महात्मा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.