संजय राठोडांची गच्छंती निश्चित; राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आता राज्यपालांकडे पाठवणार

गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. | Sanajy Rathod

संजय राठोडांची गच्छंती निश्चित; राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आता राज्यपालांकडे पाठवणार
संजय राठोड, शिवसेना आमदार
Rohit Dhamnaskar

|

Mar 04, 2021 | 3:14 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod Resignation) यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे. (CM Uddhav Thackeray will send Sanjay Rathod resignation to governor bhgatsingh koshiyari)

‘संजय राठोडांचा राजीनामा शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला’

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात आली होती. ठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता.

ठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत, असेही त्यांनी विचारले होते.

संबंधित बातम्या:

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

(CM Uddhav Thackeray will send Sanjay Rathod resignation to governor bhgatsingh koshiyari)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें