Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जीभ छाटण्यावरून काँग्रेस आक्रमक, पाहा व्हिडीओ
शिंदे गटाचे संजय गायकवाडांनंतर भाजपच्या अनिल बोंडेंनी केलेल्या विधानावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे...राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस देईल. या गायकवाडांच्या विधानानंतर बोंडेंनी राहुल गांधींच्या जीभेला चटके देण्याचं विधान केल्यानं वाद अजून वाढलाय.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक झालीय. वादग्रस्त विधानावरुन दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हेही दाखल झालेत. राहुल गांधींच्या आरक्षण विधानावर भाजप बुद्धीभेद करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. भारतात जोपर्यंत समता येत नाही, तोपर्यंत आरक्षण हटवता येणार नाही. समतेची स्थिती निर्माण झाल्यावरच तसं करता येईल, असं आरक्षणाच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर भाजप आणि शिंदे गटानं काय म्हटलं.
तूर्तास सरकारनं आपल्या वाचाळविरांना आवरावं म्हणून काँग्रेस एकदिवसीय आंदोलन पुकारणार आहे. दरम्यान बोंडेंवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर याआधी संजय गायकवाडांनी फडणवीसांविरोधात तर भाजपच्या अनिल बोंडेंनी एकनाथ शिंदेंविरोधातही वादग्रस्त विधानं केली होती., त्यामुळे दोघांच्या विधानांचा इतिहास पाहता भाजपनं सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:-
राहुल गांधींनी आरक्षणाविरोधात भाष्य केल्याचा दावा करत आतापर्यंतभाजप, वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी टीका केलीय. तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजप पुरस्कृत असल्याचा दावा काँग्रेसचा आहे.