AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता, मग इथल्या मातीचं ऋण फेडा; बाळासाहेब थोरातांनी गोयलांना फटकारले

देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. | Balasaheb Thorat Piyush Goyal

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता, मग इथल्या मातीचं ऋण फेडा; बाळासाहेब थोरातांनी गोयलांना फटकारले
पियूष गोयल आणि बाळासाहेब थोरात
| Updated on: Apr 19, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई: कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी चांगलेच फटकारले. पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी सुनावले. (Congress leader Balashaeb Thorat slams BJP minister Piysuh Goyal)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पियूष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पियूष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची डिमांड कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. पियूष गोयल हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. पण केंद्र सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही. त्यामुळे केंद्र सरकार अन्याय करत असल्याची भावना असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

फार्मा कंपनीसाठी फडणवीसांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य: बाळासाहेब थोरात

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य असल्याचे म्हटले. राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवी होती.

देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट मला पटलेली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

‘महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवता तर उपकार करता का?’

केंद्रीय मंत्री पियूष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवूनही ठाकरे सरकार कोरोनाविरुद्ध लढण्यात अपयशी ठरले, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का? मुंबईसह महाराष्ट्र तुमच्या म्हणजे केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा खणाखणा ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला ऑक्सिजनच्या नळकांड्या लावाव्या लागतील. महाराष्ट्राने देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था सदैव केली आहे. पण आज महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातील मंत्री हिशेबाच्या चोपड्या फडकवून महाराष्ट्राला त्रास देत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

मीदेखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही; खडसेंनी फडणवीसांना फटकारले

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

(Congress leader Balashaeb Thorat slams BJP minister Piysuh Goyal)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.