राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण, काँग्रेसच्या नेत्याने राज्यपालांसह भाजपवर साधला निशाणा

भारत जोडो यात्रा महागाई विरोधात आहे, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांच्या लढाई ही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण, काँग्रेसच्या नेत्याने राज्यपालांसह भाजपवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 9:08 PM

मुंबईः काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आणि ती यात्रा देशातील वेगवेगळ्या राज्यातून मार्गक्रमण करत असताना अनेक राज्यातील नागरिकांनी त्यामध्ये सहभाग दर्शविला. महाराष्टातही ही भारत जोडो यात्रा आल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांसह काँग्रेसच्या मित्र पक्षांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्याच धर्तीवर आणि भारत जोडो यात्रेच्या समर्थनासाठी मुंबईतही भाई जगताप, संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात आली.

यावेळी आमदार भाई जगताप यांनी भारत जोडोला मिळणाऱ्या प्रतिसादाबरोबरच विरोधकांकडून करण्यात आलेली टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी भाई जगताप यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून नको त्या गोष्टीवर त्यांनी टीका केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाई जगता यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याबद्दल मत विचारले असता, त्यांनी गेल्या चाळीस वर्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे वक्तव्य केले गेले नाही मात्र आता खालच्या पातळीवर जाऊन हे राजकारण भाजपकडून केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तर भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, नफरत छोडो, भारत जोडो अशा विचारांनी माणसं भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी ही भारत जोडो यात्रा महागाई विरोधात आहे, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांच्या लढाई ही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून राज्यात जे राजकारण चालू आहे. जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले गेले आहे.

ते वक्तव्य त्या पदाला न शोभणारं आहे अशी टीकाही त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.