नाना पटोले 4 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, यामागे काय रणनीती? वाचा…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी (23 जून) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. बुधवारी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

नाना पटोले 4 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, यामागे काय रणनीती? वाचा...
nana patole


मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी (23 जून) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. बुधवारी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. ते धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत (Congress state president Nana Patole on nort Maharashtra tour for 4 days).

फैजपूर येथे तीन कृषी कायद्यांच्या प्रती जाळून दौऱ्याची सुरुवात

काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन संपन्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून बुधवारी केंद्र सरकारच्या विरोधातील हे आंदोलन होणार असल्यानं याला वेगळं महत्त्व असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे काँग्रेसच्यावतीने तिन्ही काळ्या कृषी कायद्याच्या प्रतींचे दहन करण्यात येणार असल्यानं काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसतंय. कृषी कायद्याच्या प्रती दहनानंतर नाना पटोले शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार

या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील. याशिवाय ते काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत. ते ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे हेही असतील.

पटोले यांचा 4 दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरु होऊन 26 जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल.

हेही वाचा :

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन मविआ सरकार अस्थिर करण्याचं भाजपचं षडयंत्र; नाना पटोलेंचा आरोप

‘शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”, विरोधी पक्षाची मोट बांधण्याच्या पवारांच्या प्रयत्नावर काँग्रेसची प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहा :

Congress state president Nana Patole on nort Maharashtra tour for 4 days