AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”, विरोधी पक्षाची मोट बांधण्याच्या पवारांच्या प्रयत्नावर काँग्रेसची प्रतिक्रिया

पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

'शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही, विरोधी पक्षाची मोट बांधण्याच्या पवारांच्या प्रयत्नावर काँग्रेसची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आता भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्यसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. आज राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत दुसऱ्यांदा बैठक पार पडल्यानंतर शरद पवार मंगळवारी 15 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीवर बोलताना शरद पवार यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. (Nana Patole on Sharad Pawar’s meeting of 15 political parties against BJP)

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्या दुपारी 4 वाजता ही 15 विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे या बैठकील काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात 15 विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत. स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही. आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय.

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु’

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबतही पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी भाजपसोबत आघाडी करावी, असं सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामागील मुख्य कारण केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचं पटोले म्हणाले. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचं आम्ही पाहतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, त्याचा काँग्रेस निषेध करतेय, असंही पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास

Nana Patole on Sharad Pawar’s meeting of 15 political parties against BJP

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.