बोरिवलीतील पुलाचा खर्च 300 टक्क्यांनी वाढला, स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळला

161 कोटी रुपयांचा खर्च तब्बल 651 कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. या वाढीव खर्चाला मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.

बोरिवलीतील पुलाचा खर्च 300 टक्क्यांनी वाढला, स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळला
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 16, 2021 | 11:43 PM

बोरिवली : स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाण पुलाचा बांधकामाचा खर्च तब्बल 300 टक्क्यांनी वाढला आहे. 161 कोटी रुपयांचा खर्च तब्बल 651 कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. या वाढीव खर्चाला मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीने नव्याने निवीदा काढून हे काम करुन घेण्याचे निर्देश देत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. (Construction cost of the flyover in Borivali has gone up by 300 percent)

बोरीवली कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी महानगर पालिकेने 2018 मध्ये मंजूरी दिली होती. नोव्हेंबर 2018 पासून हे काम सुरु करण्यात आलं. मात्र, त्यानंतर या पुलाच्या बांधणीत आणि लांबी वाढविण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला. त्यासाठी निवीदा न मागवता त्याच कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. त्यामुळे हा खर्च 161 कोटी रुपयां वरुन 651 कोटी रुपयांवर जाणार होता. या वाढीव खर्चाला मंजूरी देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समिती पुढे मांडण्यात आला होता.

पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे हा पूल बांधण्यात येणार होता. मात्र, 2 वर्षांत पालिका फक्त कागदी कार्यवाही करत बसली. आता स्थायी समितीने हा प्रस्ताव नाकारल्याने नव्याने निवीदा मागवाव्या लागणार आहेत. त्यात किमान चार ते पाच महिन्यांचा कालावधी खर्च होणार आहे. त्यामुळे पुलांच्या बांधकामाचा कालावधीही वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

देशात आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? यादी एका क्लिकवर

नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Construction cost of the flyover in Borivali has gone up by 300 percent

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें