Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

| Updated on: Mar 15, 2020 | 8:46 AM

कोरोनाची वाढती दहशत पाहता मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
Follow us on

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 31 वर येऊन (Corona Effect On Mumbai IIT) पोहोचली आहे. कोरोनाची वाढती दहशत पाहता मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आयआयटीने 29 मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग, तसेच प्रयोगशाळा (Corona Effect On Mumbai IIT) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे, राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता मुंबई आयआयटीकडूनही सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे 29 मार्चपर्यंत वर्ग, तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना 29 मार्चपर्यंत त्यांच्या घरी जायचे असल्यास त्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

ज्या विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रवासासाठी काही अडचण येत असेल, शिवाय मुंबई आयआयटीत शिकत असलेल्या बाहेर देशातील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आली आहे की, ते मुंबई आयआयटी हॉस्टेलमध्ये सुट्टी दरम्यान राहू शकतील.

राज्यातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद

राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार, कोरोना (Corona Effect On Mumbai IIT) विषाणूचा प्रादुर्भाव (Corona virus School college closed) रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

राज्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वरुन 31 वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड या ठिकाणी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे. तर (Corona Effect On Mumbai IIT) राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या :

CoronaVirus: कोरोना संसर्ग झालेल्या अधिकाऱ्याची भेट, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी

Corona Virus Update | पुण्यात 15 जणांना कोरोनाची लागण, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी