Mumbai corona update : कहर सुरुच! मुंबईत पुन्हा 8000 पेक्षा जास्त रुग्णांची भर, आजची रुग्णवाढ किती? वाचा सविस्तर

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे, मुंबईत पुन्हा 8000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजरा 82 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली आहे.

Mumbai corona update : कहर सुरुच! मुंबईत पुन्हा 8000 पेक्षा जास्त रुग्णांची भर, आजची रुग्णवाढ किती? वाचा सविस्तर
CORONA AND BMC
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 7:38 PM

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे, मुंबईत पुन्हा 8000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजरा 82 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली आहे. काल मुंबईत (Mumbai) 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. तर शनिवारी मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे. आज मुंंबईत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट धिरोदात्तपणे हाताळलण्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra ) तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित (Omicron)  रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. या दुहेरी संकटामुळे आता राज्य लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर असल्याचं मंत्र्यांकडून म्हटलं जातंय.

गेल्या दहा दिवसातली मुंबईतील कोरोना आकडेवारी

3 जानेवारी 8082 2 जानेवारी 8063 1 जानेवारी -6347 31 डिसेंबर – 5428 30 डिसेंबर – 3671 29 डिसेंबर – 2510 28 डिसेंबर – 1377 27 डिसेंबर – 809 26 डिसेंबर – 922 25 डिसेंबर – 757 24 डिसेंबर – 683

धारावी पुन्हा अलर्टवर

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता तिसऱ्या लाटेतही धारावी आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत आहेत. आज धारावी आणि परिसरात 262 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. धारावीत आज कोरोनाचे 41 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दादरमध्ये 91 आणि माहीममध्ये सर्वाधिक 130 रुग्ण आढळले आहेत. म्हणजे या तीन्ही भागात आज दिवसभरात 262 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

‘आता फक्त एकच…’, अजिंक्य रहाणेच्या टेस्ट करीअरबद्दल गावस्करांच मोठं विधान

साखरेचं अर्थचक्र: उत्तरप्रदेशात घट, महाराष्ट्रात वाढ; देशात 115 लाख टन साखर उत्पादन

मुंबईहून बेलापूरला पोहोचा अवघ्या 35 मिनिटात; वॉटर टॅक्सीतून करा सुस्साट जलप्रवास!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.