AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 11:03 PM
Share

मुंबई : अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. (Corona Vaccination facility for bedridden patients through health department)

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे, त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvacc2bedridden@Gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथका मार्फत करणे सोयीचे होईल.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

कोरोना बळींच्या संख्येत महाराष्ट्र अव्वलच

गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 38 हजार 079 नवे रुग्ण सापडलेत. यात महाराष्ट्रात 7 हजार 761 रुग्णांचा समावेश. महाराष्ट्र कोरोना रुग्ण मिळण्याच्या बाबतीत अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात 13 हजार 750 कोरोना रुग्ण सापडलेत. केरळ आणि महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश-2 हजार 345, तामिळनाडू- 2 हजार 312 आणि ओडिशा- 2 हजार 070 एवढे कोरोना रुग्ण सापडलेत.

विशेष म्हणजे देशातले 74.16 टक्के रुग्ण हे फक्त वरील पाच राज्यात सापडलेत. त्यात एकट्या केरळची भागीदारी ही 36 टक्के एवढी आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी झालेलं नाही. गेल्या चोवीस तासात 560 जणांना जीव गमवावा लागलाय.

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 167 जण कोरोनाचे बळी ठरलेत. तर बळींच्या बाबतीत केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं 130 लोकांचा कोरोनाने मृत्यू झालाय. पण एक गोष्ट जी दुर्लक्षित करता येत नाही ती म्हणजे रिकव्हरी रेट. तो 97.31 टक्क्यावर गेलाय. आकडेवारीतच सांगायचं तर देशात गेल्या चोवीस तासात 43 हजार 916 कोरोना रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत 3 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोनातून ठिकठाक झालेत. देशात अॅक्टीव रुग्णांची संख्या 4 लाख 24 हजार 25 एवढी आहे. गेल्या चोवीस तासात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 397 ने कमी झालीय.

इतर बातम्या

आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश!

Video | सर्पमित्राने विषारी नागिणीला घरी आणलं, दिला 18 पिलांना जन्म, पाहा व्हिडीओ

होय ती अफवाच, दुबईहून आलेल्या खासगी विमानात स्फोटकं सापडले नाहीत, खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध सुरु

(Corona Vaccination facility for bedridden patients through health department)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.