Video | सर्पमित्राने विषारी नागिणीला घरी आणलं, दिला 18 पिलांना जन्म, पाहा व्हिडीओ

चेंबूर वाशिनाका येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात नागिणीने एकूण 18 पिलांना जन्म दिला आहे.

Video | सर्पमित्राने विषारी नागिणीला घरी आणलं, दिला 18 पिलांना जन्म, पाहा व्हिडीओ
CHEMBUR SNAKELET

मुंबई : चेंबूर वाशिनाका येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात नागिणीने एकूण 18 पिलांना जन्म दिला आहे. सर्पमित्र अमान खान यांनी चेंबूर मधील एका गरोधर नागिणीची सुटका केली होती. यावेळी घटनास्थळी ही नागीण अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आली होती. त्यावेळी तिला हालचाल करणे देखील शक्य नव्हते. याच नागिणीने आता 18 पिलांना जन्म दिला आहे. (snake given birth to 18 snakelet in Chembur Vashi Naka)

घरी आणताच त्या नागिणीने 18 अंडी दिली

मिळालेल्या माहितीनुसार चेंबूर वाशिनाका येते अमान खान हे सर्पमित्र राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे एका गरोदार नागिणीची सुटका केली होती. ती अतिशय अशक्त असल्यामुळे खान यांनी तिला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. घरी आणताच त्या नागिणीने 18 अंडी दिली होती. यावेळी नागीण अत्यंत अशक्त असल्यामुळे तिला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर्पमित्राने 18 अंडी घरातच कृत्रिमरित्ता उबविले

मात्र अमान यांनी नागिणीने दिलेली 18 अंडी घरातच कृत्रिमरित्ता उबविले. त्यानंतर मागील आठवड्यातच त्या अंड्यांमधून 18 पिल्ले बाहेर आले आहेत. या सर्व पिलांची प्रकृती उत्तम आहे. पिलांचा जन्म झाल्यानंतर अमान खान यांनी वनविभागला माहिती दिली. तसेच या सर्व पिलांना सुखरूपपणे नैसर्गिक आधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले. खान यांच्या प्रयत्नांनी हे सर्व पिलं नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहेत.

साप स्वत:हून कधीच ईजा पोहोचवत नाही

खांनी या नागीण तसेच पिलांचा सांभाळ केल्यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत केले जात आहे. तसेच सर्प हा माणसाचा मित्र आहे. तो स्वत:हून कधीच ईजा पोहोचवत नाही. सापाच्या विषापासून प्रतिविषे तयार केली जातात. विषारी साप नष्ट झाले तर अशी औषधे तयार करायची कोठून ? अशी समस्या उभी राहील. ही बाब लक्षात घेऊन सापांना जीवदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे सर्पमित्रांनी सांगितले आहे.

साप दिसल्यास काय करावे ?

साप दिसल्यास त्वरित 1926 हॅलो फॅारेस्ट या क्रमांकावर संपर्क साधावा, फायर ब्रिगेड व स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क करावा, असे आवहान सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी नागरिकांना केले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video | आधी झुंज नंतर हार, विषारी कोब्राने दुसऱ्या सापाला गिळंकृत केलं, व्हिडीओ व्हायरल

(snake given birth to 18 snakelet in Chembur Vashi Naka)

Published On - 9:36 pm, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI