लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट, जागाच मिळत नसल्याने धंदा बसला

Fish Market | मुंबईसह राज्यातील विविध बंदरांवरून मासे येथे येतात. तसेच येथून मासे विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जातात. जवळपास पन्नास वर्षे ही बाजारपेठ याच ठिकाणी सुरू असल्याने व्यापाऱ्यांचा ग्राहकवर्ग बांधला गेला आहे.

लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट, जागाच मिळत नसल्याने धंदा बसला
मच्छी मार्केट

मुंबई: पावसाळ्यात दोन महिने बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील (क्रॉफर्ड मार्केट) विक्रेत्यांपुढे मासे विक्रीचा पेच निर्माण झाला आहे. या बाजारातील धोकादायक इमारती पालिकेने रिकामी केल्याने व्यवसायाचे अर्थचक्र बिघडले असल्याची चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली. तसेच मूळ बाजार परिसरातच पर्यायी जागा शोधताना विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबईसह राज्यातील विविध बंदरांवरून मासे येथे येतात. तसेच येथून मासे विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जातात. जवळपास पन्नास वर्षे ही बाजारपेठ याच ठिकाणी सुरू असल्याने व्यापाऱ्यांचा ग्राहकवर्ग बांधला गेला आहे. ‘मुंबईतून थेट ऐरोलीत स्थलांतर झाले तर ग्राहक तुटतील आणि व्यवसायावर परिणाम होईल. त्यामुळे पालिकेने मूळ बाजारपेठेच्या परिसरातच पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.

मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली होती. आता नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव पुन्हा आपल्या नौका समुद्रात उतरवतील.

पावसाळ्यात मासेमारीसाठी का बंदी असते?

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीच्या प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जिवीत व वित्त हानी होऊ नये. यासाठीही ही बंदी घालण्यात येते.

संबंधित बातम्या:

मासेमारी करणाऱ्याला सापडला दुर्मिळ नारंगी मोती, किंमत ऐकून भुवया उंचावतील

कोकणातील मासेमारी व्यवसायाला कोरोनाचा विळखा, निर्यात 40 टक्क्यांनी घटली

समुद्रातून पापलेट गायब, मच्छीमार हैराण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI