2 एप्रिलपासून मेट्रोचा गारेगाव प्रवास नागरिकांना करता येईल
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो 2 अ’ मार्गिकेवरील डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व आणि ‘मेट्रो 7’ मार्गिकेवरील आरे ते दहिसर पूर्व दरम्यानचा मार्ग खुला केला जाणार आहे. मेट्रोकडून प्रत्येक स्टेशनवरती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रोची पहिल्या टप्प्याची चाचणी पुर्ण झाल्यानंतर मेट्रोकडून एमएमआरडीएला सीएमआरएस पत्र प्राप्त झाले आहे. तसेच गुडी पाडव्याचा मुहूर्त ठरल्याने मेट्रोकडून उद्घाटनाची पुर्ण तयारी सुरू आहे. मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून 2 एप्रिलपासून मेट्रो धावू लागेल. मेट्रोचा गारेगार प्रवास नागरिकांना करता येणार आहे. उद्घाटन सायंकाळच्या सुमारास असल्याने त्या दिवशी मर्यादीत सेवा चालवल्या जातील अशी माहिती मेट्रोपॉलिटन कमिशनर एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली आहे.
प्रत्येक मेट्रोच्या गाडीमध्ये दहा मिनिटाचं अंतर असेल
एमएमआरडीएने सुमारे 200 सेवा चालवण्याची योजना आखली आहे. प्रत्येक मेट्रोच्या गाडीमध्ये दहा मिनिटाचं अंतर असेल. मेट्रोचा दुसरा टप्पा हा अधिक लोकवस्तीच्या परिसरातून जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा अधिक फायदा होईल. मेट्रोच्या प्रत्येक डब्ब्यात सीसीटिव्ही असेल. तसेच पहिल्या टप्प्यात ज्या सेवा देण्यात आल्या आहेत त्या सेवा दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात आली आहे.
सुरू होणारी स्थानके
डहाणूकरवाडी, कांदिवली (प), पहाडी एक्सर, बोरिवली (प), एक्सर, मांडपेश्वर, कांदरपाडा, आनंदनगर, दहिसर (पू) इत्यादी स्थानके सुरू करण्यात येणार आहेत.