मोठी बातमी! मुंबईतल्या शाळा सुरु होणार का? महापौर म्हणतात, दोन दिवसात आढावा

राज्यात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू कधी होणार याचं गूढ वाढलं आहे. (Decision on reopening of schools soon says mayor kishori pednekar)

मोठी बातमी! मुंबईतल्या शाळा सुरु होणार का? महापौर म्हणतात, दोन दिवसात आढावा
kishori pednekar

मुंबई: राज्यात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू कधी होणार याचं गूढ वाढलं आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यता आलं असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (Decision on reopening of schools soon says mayor kishori pednekar)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत मोठं विधान केलं. शाळा सुरु करण्यास राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. दोन दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण

मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

मुंबईत कोरोना रेट कमी

मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबईतील लसीकरणाची स्थिती

कोविड 19 विरोधात 40 टक्के नागरिक लसीकरणातून पूर्णपणे सुरक्षित आहेत. 85 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. दोन्ही डोस घेण्यात 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत. तर आरोग्य कर्मचारी अद्याप पिछाडीवर आहेत. कोरोना विरोधात लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. मुंबईने ही आता लसीकरणात एक कोटीचा टप्पा गाठत वेग धरला आहे. पालिकेने वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण सुरू केले असून आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेत 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत. या वयोगटातील 90 टक्के नागरिक पहिला तर 59 टक्के नागरिक दोन्ही डोस घेऊन पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत. मात्र, ज्यांचे लसीकरण सर्वात आधी सुरू झाले म्हणजेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रटंलाईन वर्कर्स हे अजून लसीकरणात पिछाडीवर आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 52 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर, 57 टक्के फ्रंटलाईन वर्कर्स सुरक्षित झाले आहेत. (Decision on reopening of schools soon says mayor kishori pednekar)

 

संबंधित बातम्या:

अनिल परब यांना आणखी एक समन्स, चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहा, ईडीचे आदेश

समाजकल्याण खात्याने दिलेल्या गटई स्टॉल्सवरही कारवाई; स्टॉलधारकांचे ठाणे पालिकेसमोर आंदोलन

हाफ चिकन फ्राईड राईस महागात, चायनीज खाल्ल्याने विषबाधा, 6 मुलं रुग्णालयात

(Decision on reopening of schools soon says mayor kishori pednekar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI