AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’चे आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण; वरळी वांद्रे सेतूसह पाहाता येणार समुद्राचे विहंगम दृश्य

"पावसाचे पाणी वाहून समुद्रात (sea) नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर केवळ 10 महिन्यांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय  'व्ह्युइंग डेक'चे ('Viewing deck') लोकार्पण आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले.

'माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक'चे आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण; वरळी वांद्रे सेतूसह पाहाता येणार समुद्राचे विहंगम दृश्य
आदित्य ठाकरेंच्या हस्ते 'माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक'चे लोकार्पण
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 7:35 PM
Share

मुंबई : “पावसाचे पाणी वाहून समुद्रात (sea) नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर केवळ 10 महिन्यांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय  ‘व्ह्युइंग डेक’चे (‘Viewing deck’) लोकार्पण आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध झाले आहे. हे   ‘व्ह्युइंग डेक ‘चैत्यभूमीजवळ असल्याने त्याचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’ असे करण्यात यावे असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या स्थळाच्या धर्तीवर मुंबईतील इतर पातमुखांवर देखील ‘व्ह्युइंग डेक’ उभारावेत” असेही निर्देश त्यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. आदित्य ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती

‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’च्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह  आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका सभागृह नेता तथा स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत, माजी महापौर व नगरसेवक मिलिंद वैद्य, माजी महापौर व नगरसेविका  श्रद्धा जाधव, नगरसेविका  प्रीती पाटणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, हर्षद काळे, उपआयुुक्‍त (परिमंडळ २)  ‘जी उत्‍तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर यांची देखील उपस्थिती होती.

 ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’ची वैशिष्ट्ये

1. डेकची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट आहे

2. डेक चे क्षेत्रफळ 10 हजार चौरस फूट इतके आहे

3. डेकचे बांधकाम मार्च 2021 मध्ये सुरू झाले होते व केवळ दहा महिन्यांमध्ये या भव्य व देखण्या डेकचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

4. डेकची उभारणी एकूण 26 पिलर्सवर करण्यात आली आहे.

5. डेकवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या ‘एलईडी’ दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे.

6. या डेकवर एका वेळी 300 व्यक्ती उभ्या राहू शकतात.

7. डेकवर किमान 100 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी 26 बाक ठेवण्यात आली आहेत.

8) विशेष म्हणजे या डेकवर विविध प्रकारची 130 झाडे लावण्यात आली आहेत.

9. दादर व सभोवतीच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा या डेक खाली असणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखातून समुद्रात करण्यात येतो.

संबंधित बातम्या

आघाडीच्या नेत्यांपाठी ईडीचा ससेमिरा लावण्यामागे फडणवीसांचे कारस्थान, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली, लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.