AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast News : मोठी बातमी! दिल्ली स्फोटाचे तार ठाणे जिल्ह्यापर्यंत?

Delhi Blast connection to Thane : लाल किल्ला परिसरात कार स्फोटात 12 हून अधिक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. याप्रकरणी तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरु केली आहे. आता स्फोटाचे तार महाराष्ट्रापर्यंत तर नाही ना याचा तपास सुरू झाला आहे.

Delhi Blast News : मोठी बातमी! दिल्ली स्फोटाचे तार ठाणे जिल्ह्यापर्यंत?
दिल्ली स्फोट ठाणे कनेक्शन
| Updated on: Nov 13, 2025 | 12:51 PM
Share

Delhi Lal Kila Blast News : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आय 20 कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हा स्फोट घडवून आणण्यात आला. डॉ. उमर याने आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. देशात 6 डिसेंबर रोजी मोठे स्फोट घडवून आणण्याचा कट होता. पण तो अगोदरच उधळल्याने उमरने गडबडीत हा स्फोट केल्याची माहिती समोर येत आहे. या कार स्फोटात 12 हून अधिक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. याप्रकरणी तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरु केली आहे. आता स्फोटाचे तार महाराष्ट्रापर्यंत तर नाही ना याचा तपास सुरू झाला आहे.

दिल्लीचे स्फोटाचे कनेक्शन ठाण्यापर्यंत?

दिल्ली येथील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाचे कनेक्शन ठाणे जिल्ह्यापर्यंत तर नाही ना या रोखाने तपास सुरू झाला आहे. ९ सप्टेंबर २०२५ या दिवशी कल्याण येथून आफताब कुरेशी आणि मुंब्रा येथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने ताब्यात घेतले होते. ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना ताब्यात घेतले होते.

सुफियान आणि आफ्ताब देशात दहशतवादी हल्ले घडवणारे होते. त्यांचा दिल्ली लाल किल्ला बॅाम्ब स्फोटाशी संबंध आहे का? याची चौकशी दिल्ली स्पेशल सेल करणार आहे. आफताब आणि सुफियान यांच्या तपासात त्यांची जी मोडसओपरंडी समोर आलीये, त्या सारखाच कट लाल किल्ला येथील बॅाम्ब स्फोटात दिसून येत आहे. या संशयावरून या दोन्ही तरुणांची चौकशी केली जाणार अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुत्रांनी दिलीये. तसंच याआधी महाराष्ट्रातून दहशतवादी कृत्य आरोपाखाली अटक केलेल्यांची देखील होणार पुन्हा चौकशी देशात विविध ठिकाणी विविध दहशतवादी संघटना मिळून दहशतवादी कृत्य करणार होते या माहितीच्या आधारावर सर्व अटकेतील दहशतवाद्यांची चौकशी केली जाणार आहे.

13 जणांचा मृत्यू

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, दिल्ली स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला आहे. आता या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. व्हॉईट कॉलर दहशतवाद्यांकडून असे हल्ले करण्याचा डाव जैशने आखल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याची धमकी दिली होती. भारताने यावर्षी मे महिन्यात केलेल्या हल्ल्यात त्याचा जावाई आणि इतर नातेवाईक ठार झाले होते. तेव्हापासून तो भारतात अजून हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. देशातील जैशची स्लीपर सेल सक्रिय झाल्याचे या स्फोटातून समोर आले आहे.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.