AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, ICU वॉर्ड फुल्ल, रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ

Mumbai | मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, ICU वॉर्ड फुल्ल, रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ
मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU Ward) नव्या रुग्णांना भरती करण्यासाठी जागा उरलेली नाही. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांनाही ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये खाटा नसल्यास रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार केले जात आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कहर

केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे.जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ महिन्यांत 1848 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338 रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848, तर काविळीचे 165 तसेच स्वाइन फ्लू आजाराचे 45 रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले असल्याचे सांगण्यात आले.

डोंगरी, परळ, वांद्रेत सर्वाधिक रुग्ण

डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी विभाग), परळ (एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली आहे. तसेच यातील 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.

महापौरांकडून पाहणी

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महापौर निवासस्थानी डेंग्यू, मलेरियाच्या साथीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माटुंगा, सायन येथील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पाणी कुठल्याही प्रकारे साचून राहू नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. मुंबईत डेंगू मलेरियाच प्रमाण वाढत आहे. साचलेल्या पाण्यात डेंगूच्या आळ्या तयार होत असतात. पालिकेकडून पाणी साचू देऊ नये असं आव्हान केलं जातं आहे. मुंबईत इमारतीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना याठिकाणी पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी साचू देऊ नका, असं आवाहन महापौरांनी केलं आहे.

मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे काय?

जर लोकांचा ताप 2-3 दिवसात कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे .हे लक्षणे मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुले आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणे, कावीळ सारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या. सम लक्षणांमुळे कोविड रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणे आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती काढून टाकली पाहिजेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था आहे याची खात्री करून घ्या. डास चावणे टाळण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला आणि डास प्रतिबंधक आणि जाळी वापरा आणि वेळोवेळी फवारणी करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या:

तंबाखू खाल्ल्याने नपुंसकतेचा धोका; गुटख्यापासून मुक्ती कशी मिळवाल?

बापरे! वाशिममध्ये बालकांना ‘मिस-सी’ आजाराची लागण; आतापर्यंत 30 पेक्षा अधिक बालके आजाराच्या विळख्यात

Metabolism Booster : शरीराचं ‘मेटाबॉलिजम’ वाढवायचंय? मग, ‘या’ 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.