AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामाजिक न्याय विभागाचा खर्च, योजनांची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रभावीपणे करण्यासाठी कायदा करणार : धनंजय मुंडे

सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाचा खर्च, योजनांची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रभावीपणे करण्यासाठी कायदा करणार : धनंजय मुंडे
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 5:34 PM
Share

मुंबई : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. (Department of Social Justice will legislate for effective implementation of schemes, evaluation: Dhananjay Munde)

सामाजिक न्याय विभाग व संविधान फाऊंडेशन यासह अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संघटना व पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) हे प्रभावी माध्यम असून, यामार्फत यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे येथे उभारण्याचे विचाराधीन असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. या अभ्यास केंद्रासाठी जागा उपलब्धीनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये तसेच संविधान फाऊंडेशनचे ई झेड खोब्रागडे (सेवानिवृत्त सनदी अधिकारी), डॉ. बबन जोगदंड, अतुल भातकुले, महेंद्र मेश्राम, सिद्धार्थ भरणे, दीपक निरंजन, अतुल खोब्रागडे यासह विभागाचे अधिकारी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

8 मार्च 2020 रोजी संविधान फाऊंडेशनच्या विविध मागण्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित केलेल्या विविध मागण्यांवरदेखील या बैठकीत चर्चा झाली.

अभिनत विद्यापीठामध्ये (Deemed University) शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या प्रचलित शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या धर्तीवर लाभ देण्यात यावा, या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

संविधान सभागृह बांधण्याची मागणी मान्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिराचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही, त्याऐवजी सर्व सुविधायुक्त संविधान सभागृह बांधले जावे, अशी मागणी संविधान फाऊंडेशनने यापूर्वी केली होती. त्यावर उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत संविधान सभागृह बांधण्यासाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याचे आराखडे विभागाला प्राप्त झाले असून ही मागणी मान्य करण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

कोव्हिड काळातही 99 टक्के निधी खर्च

दरम्यान कोव्हिड-19 च्या कठीण काळात राज्य सरकारवर प्रचंड आर्थिक ताण असतानादेखील मागील वर्षी सामाजिक न्याय विभागाने विभागाला प्राप्त निधींपैकी 99 टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला. या आर्थिक वर्षात देखील आर्थिक संकटावर मात करत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विभागाच्या अनुसूचित जाती विकास योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेला ब्रेक लागणार नाही किंवा कोणत्याही योजनेचे पैसे इतरत्र वळवले जाणार नाही, अशी खात्री धनंजय मुंडे यांनी दिली.

इतर बातम्या

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

Explainer: SEBC आरक्षणामुळे आरक्षणाची सिस्टीमच बदलणार? OBC, एससी, एसटीचा कोटा कमी होणार का? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचं आवाहन

(Department of Social Justice will legislate for effective implementation of schemes, evaluation: Dhananjay Munde)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.