Ajit Pawar : ओबीसी आरक्षणावर संकट, अनेक नेते म्हणतात निवडणुकाच नको, आता अजित पवारांचं रोखठोक मत

राज्य चालवत असताना राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जायचं असतं, तीच भूमिका महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)ची आहे. पण आता बाकीच्या ओपन, एससी, एसटीच्या निवडणुका होणार आहेत आणि ओबीसींच्या होणार नाही हे न्यायाला धरून नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिलीय.

Ajit Pawar : ओबीसी आरक्षणावर संकट, अनेक नेते म्हणतात निवडणुकाच नको, आता अजित पवारांचं रोखठोक मत
अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 1:50 PM

मुंबई : निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा, या मतावर राज्य सरकार (State Government) ठाम आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिलीय.

‘कायदा स्थगित केलेला नाही’ चार-पाच राज्यात असाच प्रसंग आला होता. त्यावेळी न्यायव्यवस्थेनं निकाल वेगळा दिला होता आणि महाराष्ट्रात असा निकाल वेगळा दिलाय, हे सांगतानाच राज्य सरकारनं ज्याच्यात दुरुस्ती केली होती, तो कायदा स्थगित केलेला नाही. मात्र ओबीसींच्या जागांवरील निवडणुका थांबवल्या आहेत, हेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

‘सर्वांना सोबत घेण्याची भूमिका’ राज्य चालवत असताना राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जायचं असतं, तीच भूमिका महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)ची आहे. पण आता बाकीच्या ओपन, एससी, एसटीच्या निवडणुका होणार आहेत आणि ओबीसींच्या होणार नाही हे न्यायाला धरून नाही, असेही पवार म्हणाले.

‘विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय’ ओबीसींच्या राजकीय आरक्षणा(OBC Reservation)वरून निवडणुका थांबवण्यात आल्या, त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय, असा आरोपही अजित पवार यांनी केला. वास्तविक कुणीही सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकांना पुढे न्यायचं असतं. त्यामुळे सरकार कुणावरही अन्याय करावा, या विचाराचं अजिबात नाही. सरकारमधील सर्व मंत्री सर्व घटकांना न्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत, असे पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांनी बैठकाही घेतल्या’ आताही ओबीसींबाबत महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्याबाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत दोनदा-तीनदा बैठका घेतल्या. तज्ज्ञ लोकांचीही बैठक झाली. सरकारनं टॉपचे वकीलही दिले. तरीदेखील सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला, तो पाहिला आहे, हेही आवर्जून अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

Obc Reservation: तर सर्वच निवडणुका पुढे ढकला; ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक

Nagpur Election | उभेच्छुकांच्या नजरा प्रभाग रचनेकडं, निवडणुका लांबण्याची शक्यता; कोणता प्रभाग कुठे जाणार?

Ajit Pawar | प्रतिस्पर्ध्याचा अर्ज मागे, पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार पहिल्यांदाच बिनविरोध

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.