सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करा; अजितदादांचं पंतप्रधानांना पत्रं

कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधलं आहे. अजितदादांनी मोदींना पत्रं लिहिलं आहे. (Deputy CM Ajit Pawar asks PM Modi to intervene in Maharashtra- Karnataka border issue)

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करा; अजितदादांचं पंतप्रधानांना पत्रं
AJIT PAWAR

मुंबई: कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधलं आहे. अजितदादांनी मोदींना पत्रं लिहिलं आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे. (Deputy CM Ajit Pawar asks PM Modi to intervene in Maharashtra- Karnataka border issue)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 60 हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत, याकडे अजित पवार यांनी मोदींचं लक्ष वेधलं आहे.

अन्याय दूर करा

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्राला पाठिंबा द्या

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे. हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. (Deputy CM Ajit Pawar asks PM Modi to intervene in Maharashtra- Karnataka border issue)

 

संबंधित बातम्या:

प्रीतम मुंडे म्हणाल्या, जो तो उठतो मराठा आरक्षणाबद्दलच बोलतो, आता संभाजीराजेंचं पहिल्यांदाच उत्तर!

आधी चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंची हातमिळवणी, आता भाजप आमदाराची मनसे कार्यालयाला भेट!

राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, बच्चू कडूंचं रोखठोक उत्तर

(Deputy CM Ajit Pawar asks PM Modi to intervene in Maharashtra- Karnataka border issue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI