मुख्यमंत्र्यांनी सांगावं, क्लिप्स खऱ्या की खोट्या, ठाकरेंच्या नैतिकतेवर देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over pooja chavan suicide case)

मुख्यमंत्र्यांनी सांगावं, क्लिप्स खऱ्या की खोट्या, ठाकरेंच्या नैतिकतेवर देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:04 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात, असं आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला. (devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over pooja chavan suicide case)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी आहे. अशी स्थिती कुणाचीही होऊ नये. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नैतिक धैर्य त्यांना साथ देत नसल्याचं दिसत होतं. चेहऱ्यावर मास्क असतानाही आणि बोलतानाही त्यांना नैतिक धैर्य साथ देत नसल्याचं दिसून येत होतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीसांचे दोन सवाल

यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन सवाल केले. यवतमाळ मेडिकल कॉलेजात जे घडलं ते खरं की खोटं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्या क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं सांगतानाच तुमची नैतिकता काय आहे? हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हानच फडणवीस यांनी दिलं.

डेलकर प्रकरणाची चौकशी व्हावी

यावेळी त्यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली. ज्या ठिकाणी सुसाईड नोट सापडते किंवा घटना घडते तिथेच तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी डेलकर प्रकरणाचा जरूर तपास करावा. यात एकाही भाजप नेत्याचा हात नाही. किंबहूना यात भाजप नेत्याचा हात नसल्यानेच ते कुणाचंही नाव सांगत नाहीत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

नाईट लाईफवरून टीका

अनेक मंत्री हे स्वताला मुख्यमंत्री समजतात. म्हणून त्यांचेच मंत्री त्यांचे नियम धुडकावतात. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं वरळीतील लोक ऐकतात. म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ बिनधास्तपणे सुरू आहे. कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे, नाईटलाईफसाठी नाही. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो नाईट लाईफला नसतो, अशा शब्दांत त्यांनी नाईट लाईफवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. (devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली

मोदी फारच सरळमार्गी नेते, ते आता काँग्रेसच्या मार्गावर चाललेत: संजय राऊत

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही

(devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over pooja chavan suicide case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.