मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यामार्फत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबतचा एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. (Devendra Fadnavis demands CBI Probe into the transfer racket)

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 'त्या' अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:08 PM

मुंबई: तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यामार्फत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबतचा एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी आज राज्याच्या गृहसचिवांना भेटणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis demands CBI Probe into the transfer racket)

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. परमबीर सिंग हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाहीत. डीजींनी यापूर्वी एक रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. हा 6.3 जीबीचा डेटा आहे. त्या सर्व कॉल रेकॉर्ड आहे. मी मुख्यमंत्री असताना 2017 एका हॉटेलमध्ये काही डिलिंग सुरू असल्याचं कळलं होतं. तिथे काही पोलीस जात असल्याचं कळलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि सात ते आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. चार्जशीटही केलं. त्याच सीओआय आता आहेत. त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी डीजीची परवानगी घेतली आणि काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले. त्यात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अनेक विस्फोटक संवाद समोर येऊ लागले. हे पाहिल्यानंतर त्यातनं खूप मोठं रॅकेट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच्याशी गृहमंत्रालयाच्या लोकांचे संबंध दिसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सीओआय म्हणजे कमिशनर ऑफ इंटेलिजन्सने या प्रकरणाचा एक रिपोर्ट तयार केला. त्यांनी हा रिपोर्ट पोलीस महासंचालकांना दिला आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांकडे गेला. 8 ऑगस्ट 2020मध्ये हा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ऐकून घेतलं, मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले.

म्हणून सुबोधकुमार जैस्वाल यांनी डेप्युटेनश घेतलं

ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं त्या सीओआय यांना अडगळीच्या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं. प्रमोशन दिल्याचं भासवण्यात आलं. तर ज्यांचा या प्रकरणात हात होता त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली. त्यामुळे सुबोधकुमार जैस्वाल यांनी या पोस्टिंगला विरोध केला. तेव्हा दबावात हे सर्व होतंय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी डेप्युटेशन मागून घेतलं, असा दावा फडणवीस यांनी केला.

गृहसचिवांना भेटणार

आज या प्रकरणाचा सर्व डेटा मी गृहसचिवांना देणार आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे देणार असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी मी आज दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डेटा संवेदनशील

या अहवालात अनेक अधिकारी आणि राजकारण्यांची नावे आहेत. तसेच या डेटामधील आवाज त्यांचाच आहे की नाही? याची चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय कुणाचेही नाव घेता येणार नाही, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याची कागदपत्रे मीडियाला देता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis demands CBI Probe into the transfer racket)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, टोला लगावत देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ प्रथा मोडली

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

(Devendra Fadnavis demands CBI Probe into the transfer racket)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.