AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: काँग्रेसविरोधी आघाडी करण्याच्या ममतादीदींच्या प्रयत्नाला पवारांची साथ; देवेंद्र फडणवीसांचा दावा

काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे.

VIDEO: काँग्रेसविरोधी आघाडी करण्याच्या ममतादीदींच्या प्रयत्नाला पवारांची साथ; देवेंद्र फडणवीसांचा दावा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई: काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ममतादीदी काल मुंबईत आल्या. त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.

उद्योगांना आकृष्ट करणं बहाणा

उद्योगांना आकृष्ट करणे हा ममता बॅनर्जीचा बहाणा आहे. या दौऱ्याचा मूळ अजेंडा राजकीय होता. 2024मध्ये मोदीच सत्तेत येतील हे सर्वांनी मान्य केलं आहे म्हणून त्यांना हरवण्यासाठी काय रणनीती करता येईल याबाबतची खलबते चालली आहेत. कसं एकत्र येता येईल? याचा विचार सुरू आहे. 2019मध्येही असे प्रयोग झाले होते. पण त्या प्रयोगांना यश आलं नाही. लोकांनी मोदीजींवर विश्वास ठेवला. 2024मध्येही मोदींवरच जनता विश्वास ठेवेल, असंही त्यांनी सांगितलं.

पवार-दीदींना काँग्रेसला बाजूला ठेवायचंय

भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचं असं म्हणत असताना पवार साहेब अंडर लाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या असं म्हणायचं असतं. तुम्ही एक लक्षात घ्या, ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत. तर पवार साहेब बिटवीन द लाईन बोलणाऱ्या आहेत. दोघांचं बोलणं एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे. इतरांना सोबत घ्यायचं आहे. ममता दीदी गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये का बरं लढत आहेत? एवढ्याचसाठी की त्यांना आतापर्यंत प्रिन्सिपल अपोझिशन काँग्रेस नाही आम्हीच आहोत हे सांगायचं आहे. काँग्रसे संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत हे त्यांच्या पक्षाचं स्टेटमेंटच आहे. त्या सर्व मताला पवारांचं समर्थन आहे. पवारांचं मत हे पहिल्या दिवसापासून आहे. फक्त राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नाहीये. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच ते काँग्रेससोबत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

गुप्त भेटीने काहीच फरक पडणार नाही

यावेळी ममता बॅनर्जी, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कितीही गुप्त भेटी घ्या. 2024ला मोदींच्या नेतृत्वातच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री येतच असतात, पण गाफिल राहून चालणार नाही

वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री नेहमीच मुंबईत येत असतात. हे काही पहिल्यांदा घडत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. देशभरातील उद्योजक मुंबईत राहतात. त्यामुळे देशातील मुख्यमंत्री उद्योजकांना अपिलही करत असतात. पण माझा अनुभव असा आहे की महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या मजबूत राज्य आहे. कोणी अपिल केलं म्हणजे राज्यातून उद्योग जातील असं नाही. पण राज्याने गाफील राहून चालणार नाही. आपण फार मोठे आहोत आणि कोणी बाहेर जाणार नाही असा विचार करत बसलो आणि दुसऱ्यांना सोयी सुविधा दिल्या तर गडबड होईल. मागच्या काळात अनेक राज्यांत उद्योग गेले आहेत. मुख्यमंत्री येतात. अपिल करतात. पण त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ही दुटप्पी भूमिका

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो. तेव्हा देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात यायचे. उद्योजकांशी चर्चा करायला यायचे. मग तो काँग्रेसचा असो की भाजपचा. त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलं. कारण आपला राज्यावर कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे फरक पडत नाही. पण इथे ममतादीदी आल्यातर स्वागत होतं अन् भाजप शासित राज्याचा मुख्यमंत्री आल्यावर टीका होते. ही दुटप्पी भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, उंट, घोड्यासारखी नाही, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार

Mahaparinirvan Din: काल आनंदराज आंबेडकरांचं चैत्यभूमीवर येण्याचं आवाहन, आज बाळासाहेब म्हणतात, टाळा!

ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; भाजप नेते आशिष शेलारांची घणाघाती टीका

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.