AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या मंत्री काय प्रकरणं करतात: देवेंद्र फडणवीस

नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या मंत्री काय प्रकरणं करतात: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस नवाब मलिक शरद पवार
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.माय मराठीची क्षमा मागून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांची एकूण पाच प्रकरण आहेत. नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?

सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सलीम पटेल हे जे व्यक्ती आहेत. आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सॉलिडसमध्ये नवाब मलिक यांचे कुटुंबीय

कुर्ला येथे तीन एक जमीन 1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. ही जमीन आहे याची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे. सॉलिडसमध्ये 2019 मध्ये नवाब मलिक देखील होते. त्यांनी राजीनामा दिला. फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केली. मलिक यांचे कुटुंबीय सॉलिडसमध्ये आहेत.  याच ठिकाणच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीची खरेदी झाली 2053 रुपये स्वे. फीटने झाली. आणि अंडरवल्डच्या लोकांकडून घेतलेली जमीन 3 एकर खरेदी झाली 30 लाखात, त्यातील 20 लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला 15 लाख मिळाले आणि 10 लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

इतर बातम्या:

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Devendra Fadnavis said all documents related Nawab Malik connections with underworld peoples Salim Patel and Sardar Shahavali khan

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.