AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट? त्या भेटीवर मुख्यमंत्री थेट बोलले, फडणवीस म्हणाले आम्हाला लपूनछपून..

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Meet at Midnight: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या त्या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मोठा खुलासा केला आहे. मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली का? यावर फडणवीसांनी थेट उत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis: मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट? त्या भेटीवर मुख्यमंत्री थेट बोलले, फडणवीस म्हणाले आम्हाला लपूनछपून..
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 12:57 PM
Share

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Meet at Midnight: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री दोन वाजता भेट झाल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्तावर फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. ना ना तर्कवितर्क लढवले गेले. तर खासदार संजय राऊत यांनी आपल्याला याविषयी काही माहिती नाही, फडणवीस आणि ठाकरे हेच त्यावर बोलतील असे म्हणत चुप्पी साधली. त्यामुळे या प्रकरणात मोठा सस्पेन्स तयार झाला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले असताना माध्यमांनी त्यांना या भेटीविषयी प्रश्न केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर थेट उत्तर दिले.

लपून-छपून भेटण्याची गरज काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दखल झाले. दर्शनानंतर गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला फडणवीस उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “असं आहे की, उद्धव ठाकरे यांना जर माझ्याशी बोलायचे असेल अथवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणे होऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत, की जे लपवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल.” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री भेट झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. या भेटीवर आता पडदा पडला आहे.

काय होतं वृत्त?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने याविषयीचा दावा केला होता. सूत्रांच्या माहिती आधारे या हँडलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री 2 वाजता भेट झाल्याचे वृत्त दिले होते. त्यातून राज्यात एकच खळबळ उडाली होती. ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर झाली नसावी ना, असे तर्कवितर्क लढवले जात होते. पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणती भेट झाली नाही आणि लपूनछपून भेटण्याची कोणतीही गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर अशा खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या हँडल्सला नोटीस बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...