कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त? फडणवीसांनी जनावरांचा दाखला दिला

कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त? फडणवीसांनी जनावरांचा दाखला दिला
devendra fadnavis

राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

समीर भिसे

| Edited By: भीमराव गवळी

Dec 25, 2021 | 12:35 PM

मुंबई: राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली जनावरं विकली त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस हे कफ परेड येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या कारणांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापासून अपात्रं केलं जातं ते योग्य नाही. आठवडाभर ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांनी आपली जनावरं विकली त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. शेतकरी आपलं दु:ख सुद्धा गायी आणि बैलासोबत वाटतो, असं त्यांनी सांगितलं.

सोमाणी यांचं कौतुक

एक सुंदर गार्डन आणि पेट पार्क सुद्धा कफ परेडवासियांना मिळत आहे. त्यासाठी हर्षिता, मकरंद आणि राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. एसबी सोमाणी यांनी 70 च्या दशकात शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कामाची आधारशीला ठेवली. अनेकांना शिक्षित करण्याचं काम सोमाणी यांनी केले आहे, असं ते म्हणाले.

प्राण्यांमुळे आत्मिक अनुभूती होते

जगातील शहरामध्ये मुंबईची गणना होते. पण आज मुंबईत जागा कमी आहे. मोकळी मैदाने जपणं गरजेचं आहे. कफ परेडमध्ये पाळीव प्राण्यांसाठी जागा देण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट आहे. पाळीव प्राण्यांमुळे आत्मिक अनुभूती होते, असंही ते म्हणाले.

काय आहे उद्यान?

एसबी सोमाणी मार्ग, कफ परेड येथे पाळीव प्राण्यांसाठी उद्यान उभारण्यात आलं आहे. भाजप नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या पुढाकाराने हे उद्यान निर्माण करण्यात आलं आहे. या उद्यानात श्वानांसाठीही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

खोटे गुन्हे नोंद करणारे तुम्ही, अत्याचार करणारे तुम्ही, मग आम्हाला गोळ्याही तुम्हीच घाला; सुजाता पाटील यांचा आक्रोश

फलंदाजांचा कर्दनकाळ, तर गोलंदाज विकेट्सने मालामाल, कशा आहेत द. आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या?

जळगावच्या विलास पाटलांची कमाल, दोन्ही पत्नी बनल्या ग्रामपंचायतीच्या मेंबर, बलाढ्य विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें