नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक

मुंबई : नक्षलवाद्यांचं आव्हान मोडून काढू, त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ, मी स्वत: हल्ला केलेल्या ठिकाणी जातोय, असे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. यात सी-60 फोर्समधील 15 जवान शहीद झाले, तर खासगी वाहनाचा चालकही मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधून, स्फोटाबाबत सविस्तर माहिती दिली.

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले, तर एका चालकाचा मृत्यू झाला. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवण्यात आला, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी दिली. मात्र, या स्फोटाच्या घटनेला गुप्तचर यंत्रणेचं अपयश म्हणता येणार नाही, असेही पोलिस महासंचालकांनी नमूद केले.

तसेच, नक्षलवाद्यांना उत्तर देण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहे. नक्षलवाद्यांचे आव्हान आम्ही मोडीत काढू. त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ, असे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल म्हणाले. तसेच, ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी मी स्वत: जाणार आहे, असेही जयस्वाल म्हणाले. जयस्वाल यांच्यासोबत इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही असतील.

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

  • सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.
  • RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
  • सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता
  • सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.
  • मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
  • जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.
  • 28 फेब्रुवारी 2019 रोजी सुबोधकुमार जयस्वाल महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी रुजू झाले

संबंधित बातम्या : 

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI