AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले…’, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी पूर्ण झाली. यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

'मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले...', धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धुळ्यात रक्कम सापडली, संजय राऊत यांचा दावा काय?Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 22, 2025 | 10:19 AM
Share

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी संपली. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले, असा आरोप संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते त्या खोलीबाहेर ठिय्या लावून बसले होते. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी केला होता. त्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकामागे एक दोन ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले?

महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न करत संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, धुळे विश्राम गृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. बुधवारी संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत.

या ट्विटनंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, आत्ताची ताजी खबर, विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर आहे. या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथील रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच!

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.