मुकेश अंबानी यांना धमकी देऊन परराज्यात लपला; अखेर धमकावणारा गजाआड
Mukesh Ambani | आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना तीनवेळा खंडणीसाठी ई-मेल करुन धमकी देण्यात आली आहे. प्रत्येक वेळी खंडणीची रक्कम वाढविण्यात आली आहे. त्यांच्याकडे 400 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. या खंडणीखोराचे बेल्जियम या देशाशी कनेक्शन समोर येत आहे.
मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी आली आहे. त्यांना चौथ्यांदा धमकवण्यात आले. त्यांना 400 कोटींची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास परिणामांसाठी तयार राहण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल आला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटींची मागणी करण्यात आली. तिसरा मेल 30 ऑक्टोबर रोजी आला. यावेळी थेट 400 कोटींची खंडणी मागण्यात आली.फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आढळली होती. दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही कार सापडली होती. त्यात 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले होते. पण मुकेश अंबानी यांना धमकी देणारा ही व्यक्ती आहे तरी कोण?
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
27 ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल आल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मात्र आरोपी सतत धमकीचा ईमेल पाठवत आहे. आता त्याने चौथ्यांदा ई-मेल पाठवला आहे. पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेत थेट तेलंगना गाठले. अंबानी यांना धमकावणाऱ्याला तेलंगनातून अटक करण्यात आली आहे. गणेश वानपारधी असं त्यांचं नाव आहे.
बेल्जियममधून मेल
हा मेल बेल्जियम या देशातून येत असल्याचे समोर आले आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा आयपी एड्रेस शोधल्यानंतर ही बाब समोर आली आहे. बेल्जियम या देशातून हा ईमेल पाठविल्याचे निष्पन्न झाले. बेल्जियममधील त्या मेल प्रोव्हाईडर कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधल्याचे समोर येत आहे. मेल पाठवणाऱ्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही व्यक्ती खरंच एखाद्या गँगस्टर गँगचा सदस्य आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. त्याचे कोणी शॉर्प शूटर भारतात आहेत का? त्यांचे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Z+ दर्जाची सुरक्षा
मुकेश अंबानी यांना सध्या Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा व्यवस्था देशातच नाही तर परदेशात पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबिय करतात. त्यासाठी 20-30 लाखांच्या घरात खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय त्यांची खासगी सुरक्षा व्यवस्था पण आहे.