AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential election: द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळणार; एनडीएच्या नेत्यांना विश्वास; पाठिंब्याबद्दल मुर्मूंनी मानले आभार

मुंबईः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential election) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या  (National Democratic Alliance) (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना महाराष्ट्रातून एनडीएच्या मतांपेक्षाही अधिक मते मिळतील व विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी […]

Presidential election: द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळणार; एनडीएच्या नेत्यांना विश्वास; पाठिंब्याबद्दल मुर्मूंनी मानले आभार
| Updated on: Jul 14, 2022 | 10:37 PM
Share

मुंबईः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential election) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या  (National Democratic Alliance) (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना महाराष्ट्रातून एनडीएच्या मतांपेक्षाही अधिक मते मिळतील व विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी द्रौपदी मुर्मू आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व डॉ. भारती पवार, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व सी. टी. रवी, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार व आमदार भारत गोगावले उपस्थित होते. शिवसेनेसह एनडीएचे घटकपक्ष, सहयोगी पक्ष व अपक्ष आमदार बैठकीस उपस्थित होते.

महान व्यक्ती या राज्यातून आली

महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला माझा नमस्कार, अशी मराठीतून सुरुवात करून द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, देशाला गौरवित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी महान व्यक्ती या राज्यातून आली आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. राज्यातील आमदार खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपण आभारी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आदिवासी महिला राष्ट्रपती होणार

यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले की, भाजपाच्या संसदीय मंडळाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपतीपदाचा मान शोषित पीडीत समाजातील महिलेला देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांची एकमताने निवड केली आहे. त्यांच्या रुपाने प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असून त्यांना महाराष्ट्रातून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळणार आहेत.

 ही नव्या युगाची सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य घरातील एका कर्तबगार महिलेला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मोदीजींचे अभिनंदन.मुर्मू यांना राज्यात विक्रमी मते मिळतील असा त्यांनीही विश्वास व्यक्त केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रथमच आदिवासी राष्ट्रपती मिळणे हे सौभाग्य आहे. ही नव्या युगाची सुरुवात आहे. या निवडणुकीत एनडीएचे खासदार – आमदार मते देतीलच पण येथे नसलेले अनेकजण मतदान करतील व मुर्मू यांना विक्रमी मते मिळतील. द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत चंद्रकांत पाटील यांनी केले. तर विनोद तावडे यांनी मुर्मू यांचा परिचय करून दिला. आशिष शेलार यांनी सूत्रसंचालन तर मंगलप्रभात लोढा यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पारंपरिक आदिवासी नृत्य करून मुर्मू यांचे स्वागत करण्यात आले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.