AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Lockdown | नवी मुंबईत 29 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे (Eknath Shinde announced seven days lockdown in new mumbai).

Navi Mumbai Lockdown | नवी मुंबईत 29 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
| Updated on: Jun 26, 2020 | 10:57 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. या भागात दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जून रोजी तब्बल 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे (Eknath Shinde announced seven days lockdown in new mumbai).

नवी मुंबईतील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे (Eknath Shinde announced seven days lockdown in new mumbai).

दिवसभरात 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण

नवी मुंबईत आज (26 जून) दिवसभरात तब्बल 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 853 वर पोहोचला आहे. शहरात दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 194 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत

नवी मुंबईत नेरुळ, ऐरोली, कोपरखैरने, घणसोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, नवी मुंबईत आज दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 3 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली.

कल्याण-डोंबिवलीत SRPF तैनात करणार

नवी मुंबई पाठोपाठ कल्याणमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कल्याणमध्ये दररोज 200 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे अखेर केडीएमसीने कोरोना रोखण्यासाठी एसआरपीएफची तुकडी बोलवली आहे. कल्याण-डोंबिवलीत 15 ते 16 कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या भागात उद्यापासून एसआरपीएफच्या तुकड्या तैनात होतील.

हेही वाचा : औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा, उपायुक्तांवर खुर्ची उगारली

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.