Eknath Shinde : शिवसेना आणि शिंदे गटात विधीमंडळ नेतेपदावरुन घमासान, अजय चौधरींच्या नियुक्तीचं पत्रं सभापतींकडे

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच गेल्या अडीच वर्षात राजकीय नुकसान झाल्याचेही त्यांनी मत मांडले. त्याआधीच मविआमध्ये गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांच्या नियुक्तीचे पत्र सभापतींकडे पाठवण्यात आली. अजय चौधरी यांच्या गटनेते पदावरुन मात्र मविआ आणि शिंदे समर्थकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले.

Eknath Shinde : शिवसेना आणि शिंदे गटात विधीमंडळ नेतेपदावरुन घमासान, अजय चौधरींच्या नियुक्तीचं पत्रं सभापतींकडे
शिवसेना आणि शिंदे गटात विधीमंडळ नेतेपदावरुन घमासान, अजय चौधरींच्या नियुक्तीचं पत्रं सभापतींकडे
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:46 PM

मुंबईः महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निकालानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र समोर आले. त्याआधीच कालपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सूरतमध्ये 35 आमदारांसोबत एकनाथ शिंदे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव सादर करत हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे मत मांडले.

पुरेसे पाठबळ नाही मग नियुक्ती कशी

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच गेल्या अडीच वर्षात राजकीय नुकसान झाल्याचेही त्यांनी मत मांडले. त्याआधीच मविआमध्ये गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांच्या नियुक्तीचे पत्र सभापतींकडे पाठवण्यात आली. अजय चौधरी यांच्या गटनेते पदावरुन मात्र मविआ आणि शिंदे समर्थकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आमदारांचे पुरेसे पाठबळ नसताना ही नियुक्ती कशी केली असा सवालही उपस्थित केला गेला आहे.

वर्षावर पुरेस पाठबळ नव्हते

एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांच्या नियुक्तीचे पत्र सभापतींकडे पाठवण्यात आल्यानंतर मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर ज्यावेळी बैठक बोलवण्यात आली त्यावेळी पुरेसे आमदार नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरींची नियक्ती कशी काय करून शकता असा सवालही शिंदे समर्थकांनी केला आहे.

राज्यातील राजकारणात घमासान

एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदावरून आता राज्यातील राजकारणात घमासान सुरू असून पुरेसे आमदार नसतानाही दुसऱ्या लोकप्रतिनिधी गटनेते म्हणून कशी नियुक्ती करू शकता असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.