AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहाच्या टपरीवरुन एकनाथ शिंदे यांंचा उद्धव ठाकरे यांना फोन, केला मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत बोलताना आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. आपण सुरतला जात असताना वाटेत वसई जवळ उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. आमचं हे षडयंत्र नसून बंड होतं असं त्यांनी म्हटले आहे.

चहाच्या टपरीवरुन एकनाथ शिंदे यांंचा उद्धव ठाकरे यांना फोन, केला मोठा गौप्यस्फोट
shinde on thackeray
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 22, 2024 | 9:21 PM
Share

Eknath Shinde on CM post offer : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडल आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंनी एका नवा खुलासा केलाय. बंडाच्या वेळी आपण वसईतल्या चहाच्या टपरीवरुन ठाकरेंना कॉल केला. त्यावेळी त्यांनी दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचं शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरुन गौप्यस्फोटही केला. बंडाची कहानीही सांगितली. सूरतला जात असतानाच, वसईतून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पण उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारल्याचं शिंदेंनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

विधान भवनातच झालं होतं नियोजन

आमचं षडयंत्र नाही तर बंड आहे, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळीच विधान भवनातच आमचं नियोजन झालं. सर्व आमदारांना राऊतांना मतदान करु दिलं आणि सूरतला रवाना झालो, आम्ही राऊतांना पराभूत करु शकलो असतो पण तसं केलं नाही. सूरतला जाताना वसईतील एका चहाच्या टपरीवरुन मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं.

मी ठाकरेंना नकार दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांना फोन केला आणि सरकार स्थापन करु, शिंदेंसोबत काय जाता असं म्हटलं. पण दिल्लीतूनही त्यांना आता उशीर झाला असं सांगण्यात आलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच होतं, पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहायचं हे त्यांचं स्वप्न होतं म्हणूनच 2019च्या निकालानंतर निकालानंतर सर्व पर्याय खुले आहेत ते त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत गौप्यस्फोट

महाविकास आघाडी होत असताना उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे, माझ्या पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरेंच म्हणालेत शरद पवारांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्याचवेळी शरद पवारांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंनीच त्यांचं नाव सूचवण्यासाठी काही माणसं पाठवली.

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे माणसं पाठवून, स्वत:चं नाव सूचवलं, असा आरोप शिंदेंनी केला. मात्र स्वत: पवारांनी आपणच ठाकरेंचं नाव पुढं केल्याचं याआधी सांगितलंय.

सस्पेंस अजूनही कायम

काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनीही शिंदे चुकीचं बोलत असून आपण त्या बैठकीतला साक्षीदार असून सरकार टिकावं म्हणून शरद पवारांनी स्वत:हून उद्धव ठाकरेंचं नाव पुढं केल्याचं म्हटलंय. तर शिंदेंचे मंत्री उदय सामंतांनी मुख्यमंत्री अगदी खरं बोलत असल्याचं म्हणत आहेत.

शिंदेंच्या बंडाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आतापर्यंत फडणवीसांसह गिरीश महाजन, दरेकरांनाही अटक करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीत सुरु होतं, असे आरोप किंवा दावे समोर आलेले आहेत. पण बंडाच्या वेळी अर्ध्या रस्त्यातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता, आणि त्यांची सीएम पदाची ऑफर नाकारली. हे नव्यानं शिंदेंनी समोर आणलं आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप