AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मोठी बातमी! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? एकनाथ शिंदेंची नाराजी कुणाला भोवणार? ते दोन मंत्री रडारवर

Eknath Shinde Shivsena : सध्या महायुतीमधील काही नेत्यांच्या कारभारावर पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची प्रकरणं समोर आल्याने जनमाणसात त्याचा परिणाम दिसून आला. तर आता शिंदे गोटातही काही मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.

Eknath Shinde : मोठी बातमी! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? एकनाथ शिंदेंची नाराजी कुणाला भोवणार? ते दोन मंत्री रडारवर
एकनाथ शिंदे Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 9:22 AM
Share

Eknath Shinde Shivsena : राज्यात सध्या महायुतीतील मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहे. काहींच्या वक्तव्याने तर काहींच्या कृतीने जनमाणसात चुकीचा संदेश गेला आहे. त्यातच चेकमेटचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विकेट पडल्यानंतर मित्र पक्षातील मंत्री सावधगिरी बाळगत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नाराजीमुळे पक्षातील दोन मंत्र्यांवर कारवाईची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये काही मंत्र्यांच्या खातेबदल होण्याची शक्यता आहे.

ते दोन मंत्री कोण?

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मधील अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिंदे यांनी अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याआधी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या काही नेत्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे समोर आले होते. तर जिल्हा परिषद निवडणुकीत काही मंत्र्यांची आणि शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस नसल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी वाद झाले. कॅमेऱ्यासमोरच जे वर्तन झाले, त्यातून पक्षाची प्रतिमाही डागळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम आता काही दिवसात मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात मोठा फेरबदल?

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही मंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते. या मंत्र्यांना अगोदर ताकीद देण्यात येईल. तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता न दाखवता त्यांचे खातेबदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांची खातेतंर्गत कामगिरीही सरस नसल्याने अशा नॉन परफॉर्मन्स नेत्यांना खातेबदल करून थेट इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता हे मंत्री कोण अशी चर्चा रंगली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात