AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कागदी बॉंडची झंझट संपली! आजपासून राज्यात e-Bond, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय

Electronic Bond in Maharashtra : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदलत्या जगाचा पासवर्ड आत्मसात केला आहे. कारण ते आल्यापासून विविध बदलांचा आणि नवीन योजनांचा त्यांनी धडाका लावला आहे. आताही असाच जनहिताचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कागदी बॉंडची झंझट संपली! आजपासून राज्यात e-Bond, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय
ई-बाँड
| Updated on: Oct 03, 2025 | 3:40 PM
Share

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर मंत्र्यांपेक्षा अत्यंत उजवी कामगिरी बजावली आहे. पाणंदमुक्ती असो वा काही जमिनीची हिस्सेवाटप मोजणीचे शुल्क असो कमी करण्याचे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. इतरही अनेक योजना त्यांनी आणल्या. त्यांच्या या कामाच्या धडाक्याचे राज्यात कौतुक होत आहे. आपल्या कामातून वेगळी छाप टाकण्यात ते बेमालूमपणे यशस्वी झाले आहेत. आता त्यांनी कागदी बाँड हद्दपार केले आहेत. त्याजागी आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात आली आहे. आयातदार व निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात ई-बाँडची सुरुवात

राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात झाली आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस ही आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होणार आहे. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे.

ई बॉंड म्हणजे काय? त्याचे फायदे जाणून घ्या

  • महाराष्ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत, National E-Governance Services Limited (NeSL) व National Informatics Centre (NIC) या संस्थांच्या तांत्रिक सहाय्याने कस्टम ई-बॉण्ड या प्रणालीचा आज शुभारंभ झाला.
  • या नव्या प्रणालीमुळे आयातदार व निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉण्ड देण्याऐवजी एकाच इलेक्ट्रॉनिक बॉण्डद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत.
  • हे बॉण्ड्स प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस इत्यादींसाठी वापरता येतील.
  • ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून आयातदार/निर्यातदार ICEGATE पोर्टलवरून ई-बॉण्ड तयार करतील, तर NeSL द्वारे ई-स्टॅम्पिंग व ई-स्वाक्षरी होईल आणि अखेरीस कस्टम अधिकाऱ्याद्वारे ऑनलाईन पडताळणी होईल.
  • मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्काचे भरणे संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे.
  • महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार निश्चित केलेले ५०० रुपयांचे शुल्क आता ऑनलाईन जमा करता येणार असून कागदी स्टॅम्पची आवश्यकता संपुष्टात येईल.
  • आधार आधारित ई-स्वाक्षरी होईल. आयातदार/निर्यातदार तसेच कस्टम अधिकारी या दोघांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक असेल.
  • कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरण पूरक दृष्टीने ‘ग्रीन गव्हर्नन्स’कडे हे मोठे पाऊल असेल.
  • रिअल टाईम पडताळणीमुळे कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणी व फसवणुकीस आळा घालता येईल.
  • ई बाँड मध्ये आधीच्या बॉण्डमध्ये आवश्यक ते बदल अथवा रक्कमवाढ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच करता येणार आहे.
  • या प्रणालीमुळे सीमाशुल्क प्रक्रिया गतिमान होणार, व्यवसाय सुलभ होणार व शासनाच्या डिजीटल इंडिया तसेच Ease of Doing Business उपक्रमांना चालना मिळणार आहे.

20 दिवसात प्रणाली विकसीत

ई-बाँडविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याविषयीचे फायदे सांगितले. महसूल विभागाअंतर्गत कस्टम डिपार्टमेंट यांच्याकडून ई बॉण्ड प्रणाली लागू झाली आहे. निर्मला सीताराम जी मुख्यमंत्री यांनी आपलं ज्या प्रणाली वर नव्हतं आपलं राज्य ज्या प्रणालीवर नव्हतं. आता आपलं राज्य ई बॉण्ड प्रणालीवर आलेलं आहे, असे ते म्हणाले.

20 दिवसांत ही प्रणाली विकसीत केल्याचे ते म्हणाले. आपला ई बॉण्ड आल्यामुळे 50 हजार कागदपत्रं आपल्याकडे आपल्या सिस्टिमवर राहतील. डिजिटल स्वाक्षरी च्या माध्यमातून हे सुरु राहणार. कागद छपाई वाचणार आहे. कागदोपत्री रेकॉर्ड पाहण्यापेक्षा ई बॉण्ड करार केला जाईल.मोदी जी जसं म्हणतात डिजिजल प्रणाली मध्ये पाऊल पुढे टाकायला हवं तस महाराष्ट्र कडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचे ते म्हणाले.

ई-बाँड प्रणाली असणारे महाराष्ट्र 17 वे राज्य

कस्टम आल्यामुळे 500 रुपयाची गरज नाही. व्यापारला 100 बनवायचे असतील तर आता ई बॉण्ड असणार आहे. स्टॅम्प पेपर घेऊन ठेवायची गरज लागणार नाही. 30 सेकंदात ई-बाँड तयार होईल. Manual पण असणार आहे. स्टॅम्प पेपर ही असणार आहे जर व्यापारांना ई बॉण्ड घ्यायच असेल ते करू शकतात. राज्याला आर्थिक फटका बसणार नाही. अशी प्रणाली आणणारे महाराष्ट्र हे 17 वे राज्य झाले आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.