Sanjay Raut: सरकारशी जुळवून घ्या… बंड करण्याआधी त्या खासदाराची आर्जव… राऊतांनी दिले खणखणीत प्रत्युत्तर… तो किस्सा व्हायरल
Sanjay Raut Sharp Replay to Rebel MP: ऑपरेशन टायगरची कुणकुण अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला लागली होती. तर बंड करण्यापूर्वी त्यातील एका खासदाराने खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आणि एक मोठा सल्ला दिला. त्यांनी सरकारशी जुळवून घेण्याची आर्जव केली, त्यावेळी राऊतांनी ठेवणीतील बॉम्ब टाकला...

Shiv Sena Operation Tiger Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरची कुणकुण उद्धव ठाकरे गटाला अगोदरच लागली होती. गेल्या दोन वर्षात चार ते पाच वेळा त्याची चर्चा झाली. तर यावेळी सहा खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावलाच. अजून पत्ते त्यांनी उघड केलेले नाही. पण ऑपरेशन टायगर फत्ते झाल्याचे मानले जाते. तर बंड करण्यापूर्वी त्यातील एका खासदाराने संजय राऊत यांची भेट घेतली आणि एक मोठा सल्ला दिला. त्यांनी संजय राऊत यांना सरकारशी जुळवून घेण्याची आर्जव केली. त्यावेळी राऊतांनी असा ठेवणीतील बॉम्ब काढला, काय दिले त्यांनी त्या खासदाराला प्रत्युत्तर?
काम करणं अवघड झालंय…
बंड करण्याआधी एका खासदाराने राऊतांसोबत दिल्लीत संवाद साधला. काम करणं अवघड झालं आहे, असं बंडखोर खासदाराकडून राऊतांसमोर खंत व्यक्त करण्यात आली. सरकारशी जुळवून घ्या, बंडखोरीआधी या खासदाराने राऊतांना आर्जव केली. बंड करण्याआधीचा एका खासदारासोबतचा संवाद रोखठोकमध्ये देण्यात आला आहे. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, तुमच्याकडे जुळवून घेण्याचा फॉर्म्युला आहे? असा रोखठोक सवाल राऊतांनी केला.
काय आहे तो संवाद?
राऊतांनी बंडापूर्वी त्या खासदाराचे नाव न घेता त्याच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. त्यांनी तो संवाद सांगितला. दिल्लीत हा खासदार त्यांना भेटायला आला होता. त्याने राऊतांशी संवाद साधला. तो संवाद त्यांनी दिला. त्यानुसार, खासदाराने त्यांच्याशी एका विषयावर बोलायचे असल्याचे सांगितले. राऊतांनी त्यांना विषय मांडण्यास सांगितले. “कसं होणार? काम करणं अवघड झालंय”, असा त्याने सूर आळवला. त्यावर राऊतांनी का? काय झालं? असा प्रति सवाल केला.
“विकासाचा निधीच मिळत नाही. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. त्यांना निधी हवाय. जरा सरकारशी जुळवून घ्या,” अशी आर्जव या खासदाराने केली.
सरकारशी कसं जुळवून घ्यायचं? तुमच्याकडे जुळवून घेण्याचा काही फॉर्म्युला आहे का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी त्या खासदाराला विचारला. त्यावर त्या खासदाराने पुन्हा सरकारशी जुळवून घ्या असे म्हटले.
राऊतांनी काढला ठेवणीतील बॉम्ब
मग राऊतांनी या खासदाराच्या मनातील भावना ओळखून त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले. अरे, बाबा. स्पष्ट बोला. तुम्हाला तंबू बदलायचा आहे. एक लक्षात घ्या. तुम्ही राजकारणातून पूर्ण बाद झाला होता. तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली. निवडणुकीचा खर्च दिला. कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला. तेव्हा तुम्ही खासदार झालात, अशी आठवण राऊतांनी त्या खासदाराला करून दिली.
तर तुम्हाला भाजप व शिंदेविरोधात मतदान झाले. विरोधी पक्षात शिवसेना आहे हे तुम्हाला माहिती होतं ना? असा ठेवणीतील बॉम्ब राऊतांनी काढला. सरकारकडून निधी मिळणार नाही आणि संघर्ष करावा लागेल हे माहिती असतानाही तुम्ही खासदार झालात. भाव वाढला आणि पक्ष बदलताय का? असा रोखठोक सवाल राऊतांनी या खासदाराला विचारला. त्यावर विकासकामांसाठी पक्ष बदलण्याचा विचार त्याने बोलून दाखवला. मग राऊतांनी विकासाच्या गप्पा मारू नका. हा केवळ एक बहाणा आहे, तुम्ही 15 कोटी रुपये घेतल्याचे कानावर आले आहे, त्याला विकास निधी कसा म्हणायचा असा सवाल राऊतांनी खासदाराला विचारताच, तो ताडकन निघून गेल्याचे राऊतांनी सांगितले. राऊतांनी सांगितलेला हा किस्सा सध्या व्हायरल झाला आहे.