Aryan Khan: आर्यनला चांगले दिवस येणार, ‘मन्नत’बाहेर आलेल्या साधू बाबाचे भाकीत

आर्यन खान आज कोणत्याही क्षणी तुरुंगातून सुटणार आहे. त्यामुळे आर्यन खानच्या मन्नत बंगल्याबाहेर किंग खान शाहरुख खानचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. (fan of Shah Rukh Khan reached outside the vow, Sadhu Baba)

Aryan Khan: आर्यनला चांगले दिवस येणार, 'मन्नत'बाहेर आलेल्या साधू बाबाचे भाकीत
sadhu baba

मुंबई: आर्यन खान आज कोणत्याही क्षणी तुरुंगातून सुटणार आहे. त्यामुळे आर्यन खानच्या मन्नत बंगल्याबाहेर किंग खान शाहरुख खानचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. वेल कम आर्यन… असं लिहिलेलं बॅनर्स फडकावत आर्यनच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली जात आहे. या ठिकाणी तर एक साधूबाबाही आला असून त्याने थेट आर्यनला चांगले दिवस येणार असल्याची भविष्यवाणीच केली आहे.

आज सकाळपासूनच मन्नत बाहेर शाहरुख खानच्या फॅन्सनी गर्दी केली आहे. मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून आणि राज्याबाहेरूनही शाहरुखचे समर्थक मन्नत बाहेर जमले आहेत. हातात वेलकम आर्यनचे बॅनर घेऊन हे लोक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच एक साधूबाबाही मन्नतबाहेर आला आहे. मध्यप्रदेशातून हा साधूबाबा आला आहे.

भविष्यवाणी काय?

मन्नतबाहेर आलेल्या या साधूबाबाने शाहरुख खान आणि आर्यन खानबाबत भविष्यवाणी केली आहे. शाहरुख आणि आर्यनला चांगले दिवस येणार आहेत, असं या साधूबाबाने म्हटलं आहे. तसेच व्यसनमुक्तीवर बंदी घाला, असं आवाहनही या साधूबाबाने लोकांना केलं आहे. या साधूबाबाने आर्यनसाठी हनुमान चालिसाचा पाठ म्हणायलाही सुरुवात केली आहे.

ठिकठिकाणी बॅनरबाजी

दरम्यान, आर्यनच्या घराबाहेर म्हणजे मन्नतच्या परिसरात आर्यनच्या फॅन्सने पोस्टर आणि बॅनर्स लावले आहेत. ‘Stay Strong Prince Aryan’ अशी बॅनरबाजी करत शाहरुखच्या समर्थकांनी घोषणाबाजीही केली आहे.

तुरुंगाबाहेर तुफान गर्दी

मन्नतच नव्हे तर ऑर्थर रोड तुरुंगाबाहेरही शाहरुखच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. शाहरुखच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केल्याने पोलिसांना तुरुंगाबाहेर बॅरिकेड्स उभाराव्या लागल्या असून पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे. शाहरुखचे अंगरक्षक तुरुंगाबाहेर आल्यावर समर्थकांनी एकच गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवावे लागले.

एक लाखाचा पर्सनल बाँड

आर्यनच्या जामिनासाठी एक लाख रुपयांच्या पर्सनल बाँडची रजिस्ट्री करण्यात आली. शाहरुख खानने पर्सनल बाँडची रक्कम जमा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जुही बनली जामीनदार

आर्यनला जामीन मिळाला आहे. त्याला उद्या तुरुंगातून सोडण्यात येईल. आज कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. आर्यनसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार बनली आहे.

 

संबंधित बातम्या:

Aryan Khan Release From Jail Live Updates | शाहरुख खानचे अंगरक्षक आर्थर रोड जेलमध्ये पोहोचले

कुडाळ मालवणमधून 2024 ला विजयी होणारच, निलेश राणेंनी रणशिंग फुंकलं

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये, त्यासाठीही नियम अटी!

(fan of Shah Rukh Khan reached outside the vow, Sadhu Baba)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI