पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग

पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा, असा नवा प्रयोग मुंबई महापालिकेच्या दोन विभाग कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. Foot operated lift

पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग
Foot operated lift


मुंबई : मुंबई महापालिकेने लिफ्टमधून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनोखा प्रयोग केला आहे. पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा, असा नवा प्रयोग महापालिकेच्या दोन विभाग कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लिफ्ट हाताच्या बोटांनी स्पर्श न करता चालवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. (Foot operated lift)

लिफ्टमध्ये कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता महापालिकेच्या जी-दक्षिण आणि एम-पश्चिम विभाग कार्यालयांमधील लिफ्टमध्ये प्रायोगिक तत्वावर पायाने बटण दाबून चालवण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने ओमटेक कंपनीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या संकल्पनेनुसार स्पर्श न करता पायाने बटणदाबून लिफ्टमध्ये प्रवेश करणे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या मजल्यावर जायचे आहे, त्या मजल्याच्या क्रमांकावर पायाने दाब देत बटण दाबता येते. ज्यामुळे हाताने स्पर्श न करता कर्मचाऱ्यांना लिफ्टमधून प्रवास करता येत आहे. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पन महापालिकेच्या संपूर्ण मुंबईतील इमारतींमध्ये राबवण्याचा विचार केला जात आहे. (Foot operated lift)

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही वाढतीच आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6364 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3515 जण कोरोनामुक्त झाले असून, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 92 हजारांच्या पुढे गेली आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची तीन तासांनी सुटका, लिफ्ट टेक्निशियनचा मात्र मृत्यू 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI