मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी नेमकी काय असते नियमावली? कशी असते प्रक्रिया?
घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. जवळपास 120 जण या होर्डिंगखाली दबली गेली. अनेक जणांचा मृत्यू झाला. जखमींचा आकडा फार मोठा आहे. या घटनेला कारणीभूत ठरलेलं होर्डिंग हे बेकायदेशीर होतं. यानंतर बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा तापला आहे. मुंबईत असे अनेक होर्डिंग पाहायला मिळतात. हे होर्डिंग कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत? हे तुम्ही-आम्ही सर्वजण जाणू शकतात. कारण होर्डिंग कुठे, कसे लावावे याबाबतचे नियम आहेत. याच नियमांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या नियमावलीमुळे नागरिकांनी जागृत व्हावं आणि अशाप्रकारच्या बेकायदेशीर होर्डिंग प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं, जेणेकरुन घाटकोपरसारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.

यंदा मुंबईमध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालं अन् तो दिवस काळा ठरला. मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाईनगर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 74 जण जखमी झाले. मुंबईत आधी धुळीचं वादळ आणि काही वेळातच अवकाळी पाऊस आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग पडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. बेकायदेशीर होर्डिंगमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र घाटकोपरमधील ही पहिलीच घटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. मागील वर्षी पुण्यातही सिग्नलला उभे असलेल्या लोकांच्या अंगावर होर्डिंग पडून पाच जण दगावले होते. आता घाटकोपरमध्येही तेच घडलं, बेकायदेशीर होर्डिंग लोकांच्या जीवाशी येत येतात तरीसुद्धा प्रशासनाकडून परवानगी कशी मिळते? होर्डिंग लावण्यासाठी कोणते नियम आहेत? याबाबत सविस्तर जाणून घ्या. ...
